मुंबई : फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळे आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम अन्न मानली जातात. फळांमध्ये ते सर्व आवश्यक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. जरी एखादी व्यक्ती फक्त फळे खात असल तरी ती अनेक दिवस जगू शकतो. पूर्वीच्या काळातही बरेचजण फक्त फळे खाऊन जगत होते. (Eating fruit at night is harmful to health)
जरी फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील फळे खाण्याची एक निश्चित वेळ असते. त्याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. काही लोक सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री कधीही फळे खातात. पण आयुर्वेदानुसार जर तुम्हाला फळाचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर सूर्यास्तानंतर ते खाऊ नका. यासाठी योग्य वेळ कोणती असावी हे जाणून घ्या.
सूर्यास्तानंतर फळे खाणे टाळा
आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर कोणतेही फळ खाल्ल्याने शरीराला फायदा होत नाही, तर ते नुकसान करते. याचे कारण असे आहे की सूर्यास्तानंतर, अन्नाच्या स्वरुपात अनेक बदल होतात. फळांसोबतही हे घडते आणि फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात. यामुळे पचनसंस्थेत अडथळे येण्याची शक्यता असते. याशिवाय सूर्यास्तानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे सूक्ष्मजीव आणि जीवाणू पसरू शकतात. हे जीवाणू फळांमध्ये चिकटून आपल्या शरीरात जातात. यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. म्हणून आयुर्वेदात रात्री फळे खाण्यास मनाई आहे.
कोणती वेळ सर्वोत्तम आहे
फळे खाण्याची उत्तम वेळ नाश्ता आणि दुपारचे जेवण दरम्यान मानली जाते. याशिवाय, तुम्ही ते सकाळपासून सूर्यास्तापूर्वी कधीही खाऊ शकता. बऱ्याच लोकांचे शरीर दिवसा सक्रिय राहते. अशा स्थितीत फळ सहज पचते आणि त्याचे पूर्ण फायदे मिळतात आणि पचनसंस्था मजबूत होते. पण जेव्हाही तुम्ही फळ खाल तेव्हा ते एकटेच खा. फळासोबत काहीही खाऊ नका किंवा मिसळू नका. आजकाल लोक शेक, सॅलड इत्यादी स्वरूपात फळे खातात. परंतु जेव्हा जेव्हा फळ इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मिसळले जातात. त्यावेळी फळातील सर्व पोषण आपल्याला मिळत नाही.
हे देखील अत्यंत महत्वाचे
फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही त्यापैकी बरेच अन्न पचन तंत्रामध्येच राहते. उर्वरित अन्न चरबीमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते. इन्सुलिन वाढण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका आहे.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health | वाढत्या वयासह शरीराला व्हिटामिनची गरज, अन्यथा गंभीर आजारांची शक्यता!https://t.co/1DN3A5Xg5M#vitamins #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
(Eating fruit at night is harmful to health)