आजकाल फॅटी लिवरचा आजार झपाट्याने पसरत आहे. या आजारात यकृतामध्ये चरबी जमा होते. त्यामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होतो ही समस्या विशेषतः अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी आहेत.
आजकाल जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. याच्या अति सेवनामुळे केवळ फॅटी लिव्हरच नाही तर इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. फॅटी लिव्हरचा आजार टाळण्यासाठी निरोगी आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही सुद्धा जंक फुडचे सेवन करत असाल तर यकृताचे काय नुकसान होते ते जाणून घ्या.
पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज ,चिप्स, सोडा आणि इतर तळलेले किंवा जास्त साखरेचे पदार्थ असलेले जंक फूड तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हे पदार्थ चवदार असले तरी यामध्ये पोषक तत्वांचा अभाव आहे. जास्त प्रमाणात साखर आणि मीठ असलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
जास्त प्रमाणात चरबी जमा होणे: जंक फुड मध्ये स्टॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. पण ही चरबी यकृतामध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे फॅटी लिव्हर होते.
साखरेचे अतिसेवन: जंक फूड मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे यकृतातील ग्लुकोजचे फॅट मध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते हे देखील फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे.
इन्सुलिन प्रतिरोधक: जंक फूड मध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि साखरेमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते. या स्थितीमुळे मेटाबोलिक सिड्रोम होऊ शकतो. त्यामध्ये चरबी जमा होण्यास योगदान देते.
जास्त कॅलरीज सेवन: जंक फूड मध्ये कॅलरीचे प्रमाण खूप जास्त असते. जेव्हा आपण या पदार्थांचे जास्त सेवन करतो तेव्हा शरीरात कॅलरीचे असंतुलन होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि यकृत्यांमध्ये चरबी जमा होईल.