Weight Loss : वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Nov 20, 2021 | 8:57 AM

सामान्यतः घरांमध्ये ज्वारीशिवाय मक्याची भाकरी, तांदळाची भाकरी आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीची भाकरी नेहमी हिवाळ्यातच खाल्ली जाते. बाजरीची भाकरी चवीसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. असे म्हणतात की, बाजरी खूप गरम असते.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
बाजरीची भाकरी
Follow us on

मुंबई : सामान्यतः घरांमध्ये ज्वारीशिवाय मक्याची भाकरी, तांदळाची भाकरी आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीची भाकरी नेहमी हिवाळ्यातच खाल्ली जाते. बाजरीची भाकरी चवीसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. असे म्हणतात की, बाजरी खूप गरम असते. त्यामुळे हिवाळ्यात ती नेहमी खाल्ली जाते. बाजरीच्या भाकरीमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर आणि लोह असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

-वजन कमी करण्यासाठी

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर गव्हाच्या चपातीऐवजी बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश करा. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचायला वेळ लागतो, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक लागत नाही.

-निरोगी त्वचेसाठी

बाजरीत अँटिऑक्सिडंट्स, सेलेनियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई सारखे फायदेशीर पोषक घटक असतात. जे त्वचेसाठी आरोग्यदायी आहेत. अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. फ्री-रॅडिकल्स त्वचेचे नुकसान करतात. व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

-रक्तदाबाची समस्या

बाजरी खाल्ल्याने ऊर्जाही मिळते. हा ऊर्जेचा खूप चांगला स्रोत आहे. बाजरीत पुरेशा प्रमाणात मॅग्‍नेशिअम आणि पोटॅशियम असते, जे सामान्य रक्तदाब राखण्‍यात मदत करतात.

-कोलेस्टेरॉल

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही बाजरी उपयुक्त आहे. ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल जास्त राहते त्यांनी आपल्या आहारात फक्त बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

-चांगल्या झोपेसाठी

बाजरी चांगल्या झोपेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तणाव कमी होतो. तणाव कमी केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रात्रीच्या जेवणात याचा समावेश करावा.

-कर्करोग आणि मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीचा समावेश करणे आवश्यक आहे. ते रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही. या दोन्हीमुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते. इतकेच नाही तर बाजरी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!