मुंबई : तळलेले पदार्थ खायला आवडतात का? मग ते तुमच्यासाठी किती हानिकारक आहे ते जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. जास्त तेल खाल्ल्यानेही कोलन कॅन्सर होऊ शकतो. मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यांसारख्या आजारांना हे अस्वास्थ्यकर पदार्थ कारणीभूत असतात असे बऱ्याच संशोधनामध्ये आढळले आहे.
संशोधनामध्ये नेमके काय?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, रेड मीटसारख्या चरबीयुक्त घटकांमुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. या प्रकारचा आहार म्हणजे कोलोरेक्टल कर्करोग धोका होतो आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास कोलन कर्करोगाचा धोका 60 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. आपण पौष्टिक फायद्यांऐवजी चवीनुसार पदार्थ निवडतो. त्यात हे सर्व तेलकट, मसालेदार, चरबीयुक्त पदार्थ असतात आणि हे पदार्थ आरोग्यासाठी कोणतेही फायदे देत नाहीत.
हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. आरोग्यदायी पदार्थ शरीर निरोगी ठेवण्यास, शरीरात ऊर्जा संचारित करण्यास आणि प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात. कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या आहारातून जास्त चरबीयुक्त पदार्थ काढून टाका. जसे की लाल मांस, तळलेले पदार्थ इत्यादींमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. इथे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता जास्त असते.
कर्करोगाचा धोका अधिक
जर तुम्हाला फॅटयुक्त पदार्थ खायचेच असतील तर ‘गुड फॅट’ असलेले अॅव्होकॅडो आणि नट्ससारखे पदार्थ निवडा. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. अल्कोहोल केवळ शरीरासाठी हानिकारक नाही तर यामुळे सात प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृत आणि कोलन कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हे पेय जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांना मिठाई खायला आवडते त्यांना मधुमेह तर होतोच पण वाईट कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढते.
(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)
संबंधित बातम्या :
Digestive Health : पचन संस्था निरोगी ठेवायचीय? माग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे Brown Rice; जाणून घ्या कसा वापर करायचा