Weight Loss : दररोज ओट्स खाल्ल्याने वजन वाढतं?

| Updated on: Jul 28, 2021 | 10:57 AM

ओट्स वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सकाळी हलका आणि पौष्टिक ओट्सचा नाश्ता घेतल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. ओट्स खाल्ल्याने आपल्याला बराच वेळ भूकही लागत नाही.

Weight Loss : दररोज ओट्स खाल्ल्याने वजन वाढतं?
ओट्स
Follow us on

मुंबई : ओट्स वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सकाळी हलका आणि पौष्टिक ओट्सचा नाश्ता घेतल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. ओट्स खाल्ल्याने आपल्याला बराच वेळ भूकही लागत नाही. ओट्समुळे चयापचय वाढण्यास देखील मदत होते. यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. मात्र, काही लोक आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवत नाही. ज्यामुळे वजन कमी होण्यापेक्षा अधिक वाढते. (Eating oats every day leads to weight loss)

ओट्समधील पौष्टिक घटक आणि फायदे

ओट्स हा एक धान्याचा प्रकार आहे. जो खायला चवदार तसेच आरोग्यासाठीही चांगला आहे. ओट्स मॅंगनीज, प्रथिने, फॉस्फरस आणि लोह समृद्ध आहे. यात प्रथिने आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये असलेले फायबर पचन प्रक्रिया चांगली करण्यास मदत करते. ओट्समध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 2014 मधील न्युट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ओट्स खाल्ल्याने आपल्याला बराच वेळ लागत नाही.

ओट्स कसे तयार करायचे

ओट्समध्ये फायबर जास्त आणि कॅलरी कमी असते. आपण ओट्समध्ये फळ, भाज्या त्यामध्ये योग्य प्रमाणात मिसळतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु आपण साखर, शेंगदाणा बटर, चॉकलेट चीज ओट्समध्ये मिक्स करून खाल्ले तर आपले वजन वाढण्याची शक्यता असते. तेलकट आणि स्टार्च भाजीपाला जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होणे कठीण होते. ओट्समध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी -1, लोह असते. जर आपण पौष्टिक आहारास योग्य प्रमाणात मिसळले तर आपल्याला फायदा होतो.

ओट्सचे फायदेशीर

आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटकांचा निचरा करते आणि आतडे निरोगी ठेवते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो. आपण ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. एका संशोधनात असे आढळले आहे की, नाश्त्यामध्ये 1.5-6 ग्रॅम ओट्स खाल्ल्याने दिवसभर आपल्याला उत्साह येतो. तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eating oats every day leads to weight loss)