मुंबई : जवळपास आपल्या सर्वांनाच पनीर (Paneer) खाण्यासाठी प्रचंड आवडते. मग पनीरची भाजी असो वा पनीर पराठा…आपल्या जेवणाचा भाग पनीर नेहमीच असतो. पण फक्त पनीर चवदारच नसून ते आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप जास्त फायदेशीर असते. पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट आणि फॉस्फरस देखील असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) आहे. यामुळेच निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये पनीरचा नक्कीच समावेश करा. कारण पनीर आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करते.
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. जे आपल्याला हाडे तयार करण्यास मदत करते. हाडे मजबूत करते. जे ऍलर्जीमुळे दूध पिऊ शकत नाहीत. त्यांनी आपल्या आहारामध्ये नक्कीच पनीरचा समावेश करायला हवा. महिला असो वा लहान मुले सर्वांनीच आहारामध्ये पनीर घ्यावे. जर मुलांना पनीर खायला आवडत नसेल तर आपण मुलांना पनीरचे पराठे तयार करून द्यावेत.
पनीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की दररोज पनीर खाणे, अंडी, मांसापेक्षा चांगले असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी क्रीम पनीर टाळणे चांगले असते. पालक पनीरचा आहारामध्ये समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.
पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. हे आपल्याला आपल्या त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यास मदत करते. आणि म्हणून आहारात दररोज पनीर ठेवा. मात्र, प्रत्येक गोष्टीचे मर्यादीत प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पनीर आपल्या त्वचेचा रंग सुधारण्याचे देखील काम करते.