मुंबई : आपल्या स्वयंपाक घरामध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप जास्त फायदेशीर असतात. मात्र, याकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो. त्यापैकी एक म्हणजे चणे जवळपास सर्वांचाच स्वयंपाक घरामध्ये भाजलेले चणे सहज मिळतात. हे चणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहेत. जर आपण दररोज सकाळी (Morning) रिकाम्या पोटी चन्याचे सेवन केले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. या चन्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. भाजलेले चणे खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.
जर तुम्ही सकाळी मूठभर भाजलेले चणे खाल्ले तर ते तुमचे वजनही नियंत्रित ठेवते. आजकालच्या जीवनामध्ये जवळपास सर्वांनाच वाढलेल्या वजनाचे टेन्शन आहे. प्रत्येकजण इथे वजन कमी करण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी जिम आणि विविध प्रकारचे व्यायाम देखील केले जातात. मात्र, इतके करूनही वाढलेले वजन काही कमी होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये चन्याचा समावेश करायला हवा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
भाजलेले चणे खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर मानले जातात. भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. याचे रोज सेवन केल्याने साखरेची समस्या दूर होते. भाजलेल्या चणामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. भाजलेल्या चणामध्येही फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यात प्रथिने आणि लोह देखील भरपूर आहे. ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उर्जेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण आपल्या आहारात भाजलेल्या चण्याचा समावेश करा.