मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात सर्वांनाच स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याचे कणीस खायला आवडते. या हंगामात संध्याकाळी गरम-गरम मक्याचे कणीस खाण्याची एक वेगळीच मजा आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मक्याच्या कणीसामध्ये विविध पौष्टिक आणि फॅटी अॅसिड असतात. यामुळे मक्याचे कणीस फक्त पावसाळ्यातच खाणे असे काहीही नाही. बाराही महिने मक्याचे कणीस खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. (Eating sweet corn during the rainy season is beneficial for health)
व्हिटॅमिन समृद्ध
मक्याचे कणीस जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात. हे व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे जो ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. याशिवाय हाडे आणि केसांनाही चांगले असते. यात व्हिटॅमिन ए असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत करते
मक्याचे कणीस फायबर समृद्ध आहे. ज्यामुळे आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपण आपल्या आहारात मक्याच्या कणीसचा समावेश केला पाहिजे. हे खाल्ल्याने, आपल्याला त्वरीत भूक लागणार नाही, यामुळे आपण कार्ब आणि चवदार पदार्थ खाणे टाळाल.
अँटीऑक्सिडेंटने समृद्ध
मक्याच्या कणसामध्ये अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. जो दाह कमी करते तसेच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतो. त्यात अँटीऑक्सिडंट्स व्यतिरिक्त कॅरोटीनोईड्स, ल्युटीन आणि झेंथाइन देखील आहेत. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
गरोदरपणात फायदेशीर
गर्भवती स्त्रिया त्यांच्या आहारात मक्याच्या कणीसचा समावेश करू शकतात. कणीस आई आणि मुलासाठी फायदेशीर आहे. मक्याच्या कणीसमध्ये फॉलिक अॅसिड असते. तथापि, गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या आहारात मक्याच्या कणीसचा समावेश करू शकता.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
अनेक लोक नेहमीच आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशांनी आपल्या आहारात मक्याचे कणीस घ्यावे कारण त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, जस्त, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eating sweet corn during the rainy season is beneficial for health)