Health Tips : ‘या’ गोष्टी भिजवून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहाल!

| Updated on: Sep 28, 2021 | 8:05 AM

आपल्या दिवसाची सुरूवात चांगल्या प्रकारे झाल्यानंतर मूड आणि आरोग्यासाठी चांगले राहते. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरूवात हेल्दी नाश्त्याने करा. सकाळच्या नाश्त्यामध्ये आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टी खाल्ल्ये पाहिजेत. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द सकाळचा नाश्ता असावा.

Health Tips : या गोष्टी भिजवून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहाल!
बदाम आणि अक्रोड
Follow us on

मुंबई : आपल्या दिवसाची सुरूवात चांगल्या प्रकारे झाल्यानंतर मूड आणि आरोग्यासाठी चांगले राहते. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरूवात हेल्दी नाश्त्याने करा. सकाळच्या नाश्त्यामध्ये आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टी खाल्ल्ये पाहिजेत. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द सकाळचा नाश्ता असावा. आपल्या आहारात सुकामेवा समाविष्ट करणे आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये अक्रोड आणि बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Eating walnuts and almonds is beneficial for health)

बदामाचे फायदे

तुमच्या दिवसाची सुरुवात भिजवलेले बदाम आणि अक्रोडने करणे फायदेशीर आहे. ही निरोगी सवय आपल्या संप्रेरकांना चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करते. हे वर्कआउट्स दरम्यान ऊर्जा देते. रात्री झोपण्याच्या अगोदर बदाम आणि अक्रोड भिजवून ठेवा. त्यांच्यात उच्च पोषण असते जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बदामाला प्रथिनांचे पॉवर हाऊस म्हणतात. यात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम समृद्ध आहे. हे स्मरणशक्ती वाढवते, पाचन तंत्र सुधारते आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड असते. त्यात व्हिटॅमिन ई, फॉलिक अॅसिड, प्रथिने आणि फायबर असतात. अक्रोडला ब्रेन फूड म्हणतात आणि ते मेंदूच्या चांगल्या कार्यासाठी मदत करते. याशिवाय अक्रोड हे कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जस्त यांचा मुख्य स्त्रोत आहे. दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चयापचय वाढते. जे वजन कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते.

या आरोग्यदायी सवयी स्वीकारा

व्यायाम करा

व्यायाम आपल्या दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे. हे आपल्याला केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्या देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे रोग दूर ठेवते.

ध्यान करा

तणाव हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. त्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून, तणाव कमी करणारे ध्यान केले पाहिजेत. तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यान आणि योगा करा.

कॅफीन

बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. पण यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. त्यामुळे सकाळी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.

ब्रेकफास्ट बनवा

पॅकेज केलेल्या कृत्रिम नाश्त्याचा वापर टाळावा. याऐवजी तुम्ही घरी पोहे, उपमा, मूग डाळ चिल्ला आणि इडली बनवू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating walnuts and almonds is beneficial for health)