मुंबई : कोरोना महामारीमुळे आपल्या सर्वांच्या शारीरिक आणि मानसिक जीवनावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान बाहेर न पडल्यामुळे वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. कोरोनाच्या काळात आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक विविध उपायांचा अवलंब करतात. (Follow these 4 tips to lose weight)
लठ्ठपणामुळे शरीरात इतर प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. यामुळे हृदयरोग आणि मधुमेहाची समस्या वाढते. जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही फाॅलो करून वाढलेले वजन कमी करू शकता.
निरोगी आहार घ्या
कोरोनाच्या अगोदर बहुतेक लोक त्यांच्या आहाराबद्दल निष्काळजी होते. पण लॉकडाऊनमुळे घरून काम करत असताना आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच बदल झाले आहेत. या दरम्यान, आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहोत आणि निरोगी गोष्टी खातो. त्याचवेळी, काही लोकांनी दैनंदिन दिनक्रमात अस्वास्थ्यकर आहार समाविष्ट केला. तसेच वर्कआउट केले नाही, ज्यामुळे वजन वाढले आहे.
व्यायाम करा
कोरोना असो किंवा नसो, व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही. उलट मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. जरी तुम्ही पातळ असलात तरी व्यायाम करणे महत्वाचे आहे. तुम्ही स्वतःवर काम करत रहा. याशिवाय व्यायाम केल्याने प्राणघातक रोगांपासून दूर राहण्यास मदत होते.
तणावापासून दूर रहा
आपल्या सर्वांना माहित आहे की तणावामुळे वजन वाढते. यामुळे, कोर्टिसोल हार्मोन तयार होतो, ज्यामुळे अन्नाची लालसा वाढते आणि आपण अधिक कॅलरीयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करतो. तणाव आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि ध्यानाची मदत घ्या. यामुळे मन आणि शरीर निरोगी राहते. तसेच योगा आणि ध्यान केल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत मिळते.
आरोग्याची काळजी घ्या
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. पौष्टिक आहार घेताना, लक्षात ठेवा की कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने वजन वाढू शकते. कॅलरी मोजण्याकडे लक्ष द्या. कोणत्याही वेळेचे अन्न सोडण्याची गरज नाही. किंवा उपाशी राहण्याची देखील काही गरज नाही. असे केल्याने तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखे वाटेल. याशिवाय रोगाचा धोकाही वाढेल.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these 4 tips to lose weight)