मुंबई : सकाळी 8 वाजताच कडक उन्ह (Summer) जाणवत आहे. उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी ही घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, यादरम्यान बरेच लोक बाहेरचे चटपटीत पदार्थ (Food) खाण्यावर अधिक भर देतात. यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याबरोबरच वजन देखील झपाट्याने वाढण्याची शक्यता 100 टक्के असते. यामुळे या हंगामात बाहेरील खाद्यपदार्थांपासून चार हात लांब राहणेच आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर (Beneficial) आहे. शिवाय निरोगी पदार्थ खाण्यावर भर द्या.
सूर्यप्रकाशामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते. ज्यामुळे आपला मूड चांगला राहतो. या काळात मन खूप चांगले राहते. व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात शरीरात जाते. व्हिटॅमिन डी शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करते. परिणामी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती चांगली वाढते. मॉर्निंग वॉक, व्यायाम, जिम या हंगामात अजिबात बंद करू नका. उलट वजन कमी करण्यासाठी आणि शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी हा हंगाम अतिशय फायदेशीर मानला जातो.
उन्हाळ्यामध्ये आपले शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त गरम राहते. शरीरातील रक्तपेशी योग्य प्रमाणात रक्त पंप करतात आणि संपूर्ण शरीरात वाहून नेतात. परिणामी चयापचय गती वाढते आणि अन्न खूप जलद पचते. तसेच हा वेळ व्यायामासाठी खूप जास्त चांगला आहे. घामाच्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात. त्यामुळे जास्त कॅलरीज वापरल्या जातात.
या हंगामात कॉफी, चहा कमी घेतला जातो. हिवाळ्यामध्ये दिवसातून सात ते आठ कप काॅफी आणि चहा घेतला जातो. यामुळे आपले वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता देखील असते. साखरयुक्त कॉफी किंवा चहा प्यायल्याने तुमचे वजन वाढते. उष्ण हवामानात कमी खाल्ले जाते. हलके, पचायला सोपे पदार्थ जास्त खाल्ले जातात. अन्नाचे प्रमाणही कमी खाल्ले जाते. म्हणूनच वजन कमी होणे इतके जलद होते.
संंबंधित बातम्या :
Skin care : कडुलिंबाचे हे फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या लगेचच दूर करा!
Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!