मुंबई : गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) आणि त्यानंतर महिलेच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. यादरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदलतात. प्रसूतीनंतर महिला बाळाच्या काळजीत इतक्या अडकतात की, त्या स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकत नाही. परिणामी त्यांचे वजन झटपट वाढते. जरीही एखाद्या महिलेने प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्याचे ठरवले तरी ती स्वत: ला वेळ देऊ शकत नाहीत.
कारण वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळच देणे खूप महत्वाचे आहे. मात्र, बाळाला वेळ देण्यामध्ये अनेक महिला आपल्या आरोग्याकडे आणि वाढलेल्या वजनाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. मात्र, यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही स्वत: चं फिट नसाल तर तुमच्या बाळाला कसे सांभाळणार आणि फिट आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा खूप महत्वाचा आहे. navbharat times ने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.
या टिप्स फाॅलो करा आणि झटपट वजन कमी करा
-आपले बाळ छोटे असले तरी देखील आपण आपल्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी व्यायाम दररोज करावा. कारण प्रसूतीनंतर आपले फिगर पूर्णपणे बदलते. यामुळे व्यायाम करून चांगले फिगर परत मिळवणे खूप आवश्यक आहे.
-थोडा वेळ आपण आपले बाळ घरातील इतर सदस्यांकडे किंवा आपल्या पार्टनरकडे द्यावे आणि जिमला जावे. यामुळे बाळाला देखील थोडा वेळ तुम्हाला सोडून राहण्याची सवय लागेल आणि बाळ देखील हळूहळू करून इतरांकडे राहिल.
-जर आपल्या घरी इतर कोणी सदस्य नसतील आणि आपला पार्टनर जाॅबला वगैरे जात असेल तर आपण संध्याकाळच्या वेळी बाळालासोबत घेऊ थोडा वेळ वाॅक केला पाहिजे.
-प्रसूतीनंतर जास्त करून पोटावरील चरबी वाढते. अशावेळी आपण एक ग्लास पाण्यात दोन ते तीन लवंगा घाला आणि त्यात दालचिनीचा एक तुकडा घालून ते उकळवा. नंतर कोमट झाल्यावर ते प्या. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
-जर तुमची डिलिव्हरी नॉर्मल असेल, तर बदाम आणि मनुकेसुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी 10 बदाम आणि 10 मनुके घ्या. मनुक्यामधील बिया काढा. दोन्ही गोष्टी एकत्र मिसळून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एक कप कोमट दुधात मिसळून प्या. यामुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते.
-वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आहार. आपल्या आहारामध्ये पाैष्टीक आणि हेल्दी पदार्थांचा समावेश करा. बाहेरील खाद्यपदार्थ पूर्णपणे खाणे टाळाच. मात्र, डाएट वगैरे करणे शक्यतो टाळा.
-अनेक स्त्रिया आपल्या फिगरचा विचार करून बाळाला जास्त स्तनपान करत नाही. परंतु, हा तुमचा गैरसमज आहे. आपल्यासाठी आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान चांगले आहे. याने केवळ मुलाचे पोषणच होत नाही, तर आपली चरबी आणि अतिरिक्त कॅलरी देखील कमी होतात.
संबंधित बातम्या :
Healthy Breakfast: नाश्त्यात काय खाणार, ओट्स की फ्लेक्स; माहिती करून घ्या काय आहे हेल्दी?
child’s height | भविष्यात किती वाढेल तुमच्या मुलाची उंची? या फार्म्यूल्याने करू शकता माहिती