Weight Loss : व्यायाम किंवा डाएटिंगशिवाय वजन कमी करायचंय?; ‘या’ टिप्स फॉलो करा! 

| Updated on: Aug 29, 2021 | 11:59 AM

पोटाची चरबी कमी करण्यासाठी अन्न आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळेल.

Weight Loss : व्यायाम किंवा डाएटिंगशिवाय वजन कमी करायचंय?; या टिप्स फॉलो करा! 
वाढलेले वजन
Follow us on

मुंबई : संपूर्ण शरीराचे वजन कमी करण्यापेक्षा पोटाची चरबी कमी करणे अधिक कठीण आहे. पोटाची चरबी वाढणे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. लठ्ठपणा वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. वजन कमी करणे सोपे काम नाही. (Follow these tips to lose weight without exercise or dieting)

त्यासाठी कठोर परिश्रम आणि एकाग्रता आवश्यक आहे. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अन्न आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळेल.

अन्नाच्या प्रमाणावर लक्ष द्या

आपल्या आहारावर यादरम्यान लक्ष द्या. जास्त अन्न खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. यामुळे वजन वाढू लागते. जर तुम्ही थोड्या प्रमाणात अन्न खाल्ले तर कॅलरीची संख्या कमी करण्याबरोबरच वजन कमी करण्यास देखील मदत होते. याद्वारे तुम्ही पोटाची चरबी देखील कमी करू शकता आणि दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त देखील राहू शकाल.

अन्न चांगले चघळा

जर तुम्हाला पोटाची चरबी वाढवायची नसेल तर जास्त प्रमाणात अन्न खाऊ नका. नेहमी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते चांगले चर्वण करून खा. असे अन्न खाल्ल्याने पचन चांगले होते. या व्यतिरिक्त, हे पाचन तंत्र सुधारण्यास देखील मदत करते.

तणावापासून दूर राहा आणि पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप न घेतल्याने वजन वाढते. अनेक अभ्यासामध्ये असेही आढळून आले आहे की झोपेच्या अभावामुळे वजन वाढू शकते आणि पोटाची चरबी कमी करण्यातही त्रास होतो. कमी झोप आणि तणाव तुमच्या शरीरातील कोर्टिसॉल हार्मोनचे उत्पादन वाढवतात आणि उच्च कॅलरीयुक्त अन्नाची लालसा वाढवण्याचे काम करते. म्हणूनच तुम्हाला दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

बसण्याची सवय

तुम्ही घरून काम करत असाल तर तेव्हा तुमच्या बसण्याची विशेष काळजी घ्या. चुकीच्या बसण्याच्या पध्दतीमुळे अनेक रोग होऊ शकतात. पोटाची चरबी वाढणे हा देखील एक दुष्परिणाम आहे. तुमच्या पोटाच्या स्नायूंसाठी तसेच तुमच्या आतड्यांसाठी चांगली बसण्याची सवय लावा. हे पाठीच्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे.

पुरेसे पाणी प्या

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने केली पाहिजे. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि चयापचय वाढण्यास मदत होते. याशिवाय, यामुळे तुमची भूक शांत राहते आणि पोट बराच काळ भरलेले राहते. तुम्ही सकाळी कोमट पाणी, हर्बल टी किंवा लिंबूपाणी पिऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

(Follow these tips to lose weight without exercise or dieting)