मुंबई : कोरोनादरम्यान आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल देखील केले आहेत. आता हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला येतो. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड यासह विविध समस्या आहेत. अशा परिस्थितीत स्वत:ला निरोगी कसे ठेवायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. यासाठी तुम्हाला शरीर डिटॉक्स करावे लागेल. म्हणजे शरीरातील दूषित पदार्थ काढून टाकले जातील. तरच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही खास टिप्स.
शरीर डिटॉक्स ठेवा
शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे डिटॉक्स ड्रिंक्स पिणे. यासाठी तुम्ही हनी सिनामन ड्रिंक, ग्रीन टी, लिंबू आणि आल्याचा चहा इत्यादी पिऊ शकता. हे तुमच्या शरीरातील दूषित पदार्थ काढून टाकतील आणि शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतील.
7-8 तासांची झोप
शरीर निरोगी ठेवण्यासाठी झोप ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही रात्री नीट झोपत नसाल तर तुमच्या मनःस्थितीवर परिणाम होईल आणि विविध शारीरिक आरोग्य समस्या निर्माण होतील. विशेषत: पचनशक्ती कमकुवत होते. त्यामुळे रोज रात्री किमान 7-8 तासांची झोप घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
हे पूर्णपणे टाळा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनशैली बदलणे. दारू, धूम्रपान, फास्ट फूड, तळलेले अन्न पूर्णपणे टाळा. अल्कोहोल यकृताचे नुकसान करते तसेच शरीराचे निर्जलीकरण करते. त्यातून मानसिक नैराश्य निर्माण होते. कर्करोग, इरेक्टाइल डिसफंक्शन, फुफ्फुसांचे नुकसान इत्यादीसाठी धूम्रपान जबाबदार आहे. यासाठी अतिरिक्त कॅफिन असलेले पदार्थ टाळा.
त्वचेची काळजी
त्वचेची काळजी घ्या. हिवाळ्यात तुमच्या त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते. त्वचा खडबडीत आणि कोरडी होते तसेच प्रदूषणामुळे त्वचा क्षीण होते. यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्या. त्वचा नेहमी स्वच्छ आणि हायड्रेटेड ठेवा.
हिरव्या पालेभाज्या आणि फळे
या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. फळे आणि हिरव्या भाज्यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त समावेश करा.
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!