मुंबई : आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस उपवास पकडला पाहिजे. मात्र, आजकाल बरेचजण वजन कमी करण्यासाठी उपवास धरतात. कारण हे नियमितपणे केल्याने लोकांना फरक जाणवला आहे. आठवड्यातून दोन दिवस उपवास केल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते. (Follow these tips when doing Intermittent Fasting)
वजन कमी करण्याबरोबरच ते पचनासाठीही चांगले असते. या व्यतिरिक्त, ते चयापचय वाढण्यास मदत करते. उपवास केल्याने आपण आपली भूक नियंत्रणात ठेवू शकतो. उपवास करताना एखाद्या व्यक्तीला 12 ते 16 तास न खाल्ल्याशिवाय राहावे लागते. म्हणूनच आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून शरीरात आवश्यक पोषक घटकांची कमतरता भासणार नाही. अधूनमधून उपवास करताना आहार घेताना कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे हे जाणून घेऊया.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा
उपवासादरम्यान आपले शरीर हायड्रेटेड ठेवा. पाणी निर्जलीकरण कमी करण्यास मदत करते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, पुरेसे पाणी पिण्याने त्वचा सुधारते आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
कडधान्य
कडधान्यामध्ये बाजरी आणि डाळींचा आहारात समावेश करावा. या व्यतिरिक्त, आहारात फायबर समृध्द पदार्थांचा समावेश करून तुम्ही बऱ्याच वेळ उपवास करू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त डाळींचा समावेश करा.
फळे आणि भाज्या
आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. आपल्याला या गोष्टींमधून आवश्यक पोषक घटक मिळतील. फळे आणि भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात. बेरी, केळी, संत्री, द्राक्षे, ब्रोकोली, गाजर आणि पालक आहारात घेणे फायदेशीर आहे.
प्रथिनेयुक्त पदार्थ खा
प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने जास्त प्रमाणात कॅलरी बर्न करतात. या व्यतिरिक्त, प्रथिने शरीराच्या पेशी आणि स्नायू दुरुस्त करण्यात मदत करतात. आपल्या आहारात सोया, मसूर, बीन्स, अंडी, चिकन, सॅल्मन, मासे इत्यादींचा समावेश करा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these tips when doing Intermittent Fasting)