Garlic Benefits : लसणाचे ‘हे’ खास 4 फायदे जाणून घ्या, वाचा याबद्दल सविस्तर!

| Updated on: Oct 03, 2021 | 10:30 AM

लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, काही लोकांना त्याचा वास आवडत नाही. बहुतेक लोक भाजी, वरण आणि करी बनवण्यासाठी याचा वापर करतात. लसूणाचे असे काही फायदे आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. हे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Garlic Benefits : लसणाचे हे खास 4 फायदे जाणून घ्या, वाचा याबद्दल सविस्तर!
लसूण
Follow us on

मुंबई : लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, काही लोकांना त्याचा वास आवडत नाही. बहुतेक लोक भाजी, वरण आणि करी बनवण्यासाठी याचा वापर करतात. लसूणाचे असे काही फायदे आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. हे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लसूणाचा वापर त्वचा, केस आणि डाग दूर करण्यासाठी केला जातो. (Garlic is beneficial for health and skin)

पोटदुखी दूर करते

अपचन आणि आंबटपणासारख्या पोटाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी लसूणचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी लसूणाची 1 कळी बारीक करून अर्धा चमचा मध मिसळून खा. हे मिश्रण रिकाम्या पोटी चावून खा. आपण त्याबरोबर थोडे पाणी पिऊ शकता. पण जास्त पाणी पिऊ नका.

मुरुमाची समस्या

मुरुमाची समस्या दूर करणे सोपे काम नाहीये. मुरुमापासून मुक्त होण्यासाठी लसूण कापून घ्या आणि प्रभावित भागावर लावा. लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे मुरुमाच्या वेदना दूर करण्यास मदत करतात. त्यात अॅलिसिन असते जे जीवाणूंपासून मुक्त होण्यास मदत करते. तसेच त्वचेचे छिद्र साफ करण्यास मदत होते.

थंडीपासून आराम मिळतो

जर तुम्हाला सर्दी, ताप आणि घसा खवखवत असेल तर तुम्ही लसूण वापरू शकता. यासाठी तुम्हाला लसूणाच्या कळ्या सोलून त्या एका ग्लास पाण्यात उकळाव्या लागतील. हे मिश्रण गाळून मधात मिसळून प्या. सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळवण्यासाठी हा एक घरगुती उपाय आहे.

डोक्यातील कोंडा दूर करते

डोक्यातील कोंड्यामुळे अनेकजण त्रस्त आहेत. अनेक प्रयत्न करूनही केसांमधील कोंड्याची समस्या दूर होत नाही. मात्र, आपण लसूणच्या मदतीने केसांमधील कोंड्याची समस्या दूर करू शकतो. यासाठी चार पाकळ्या लसूण घ्या आणि त्यामध्ये लवंग आणि मध मिक्स करा. आता ही पेस्ट आपल्या टाळूला लावा. 15 मिनिटे सोडा आणि नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Garlic is beneficial for health and skin)