मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या समस्यांमध्ये अधिक वाढ होते. बरेच लोक या थंड वातावरणात त्वचेला खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्यामध्येही या पावसाळ्याच्या हंगामात सर्वात जास्त लोक हे फंगल इन्फेक्शनमुळे त्रस्त असतात. विशेष म्हणजे अनेक उपचार घेऊनही फंगल इन्फेक्शनची समस्या दूर होत नाही. (Garlic is beneficial in eliminating the problem of fungal infections)
आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची फंगल इन्फेक्शनची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. आपण लसूणच्या सहायाने फंगल इन्फेक्शन दूर करू शकतो. यासाठी आपल्याला सात ते आठ पाकळ्या लसूण लागणार आहे. लसूणची बारीक पेस्ट तयार करा आणि ज्याठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे. तिथे दहा मिनिटे लावा.
त्यानंतर थंड पाण्याने धुवा. मात्र, फंगल इन्फेक्शनला लसूण लावताना कायम हे लक्षात असून द्या की, लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये दूसरे काहीही मिक्स करू नका. लसूणची पेस्ट लावल्यानंतर थोडा त्रास होईल. मात्र, सतत आपण चार दिवस लसूणची पेस्ट फंगल इन्फेक्शनवर लावली तर फंगल इन्फेक्शनची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.
शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते.
लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. दररोज सकाळी साधारण सहा ते सात लसूणचा पाकळ्या खाल्ल्या पाहिजे. लसूण फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर इतरही अनेक आजारांवर रामबाण आहे. हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय कराhttps://t.co/0InIgl3meK#WinterDrySkin #BakingSodaScrub
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
(Garlic is beneficial in eliminating the problem of fungal infections)