मुंबई : पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरू त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, पेरूचा रस दररोज पिल्याने आपले वजन कमी करण्यासही मदत होते. (Guava juice is beneficial for weight loss)
पेरुमध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट कमी होते. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. त्यात आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना फक्त हे माहीती आहे की, पेरू आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. मात्र, लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील पेरू अत्यंत फायदेशीर आहे.
आपण दररोज सकाळी उपाशी पोटी पेरूचा रस घेतला तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. पेरूचा रस घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक पेरू लागणार आहे. पेरूचे बारीक काप करून घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवा. त्यानंतर यामध्ये थोडासा मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळेल.
पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात. दररोज पेरूची पाने खाल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होतो. शरीरात रक्त परिसंचरण चांगले राहते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो. पेरु खाल्याने आपले पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या देखील कमी होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Guava juice is beneficial for weight loss)