मुंबई : भारतीय जेवणात विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. हे मसाले जेवणात चव आणि सुगंध वाढवतात. या व्यतिरिक्त, हे मसाल्याचे पदार्थ त्यांच्या अनेक आरोग्यदायी गुणधर्मांसाठी देखील ओळखले जातात. मसाल्याची इतर घटकांप्रमाणेच कढीपत्त्याचा वापरही अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. जेवणात कढीपत्ता घातल्याने पदार्थाची चव आणि सुगंध झटपट वाढतो. हा घातक पदार्थ निरोगी बनवण्यासाठी, तसेच चव आणि सुगंध वाढवण्यासाठी ओळखला जातो.
सॅलड ड्रेसिंग, पास्ता आणि ब्रेडसाठी वापरल्या जाणाऱ्या ओरेगॅनो ऑईल किंवा बेसिल ऑईल यासारख्या इतर औषधी वनस्पती तेलांप्रमाणेच, कढीपत्त्याच्या तेलाचा वापर केल्याने तुमच्या पदार्थामध्ये ताजेपणा, सुगंध आणि चव येते. याव्यतिरिक्त, कढीपत्ता नैसर्गिकरित्या पाचन क्रिया सुधारू शकते. तसेच पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम देऊ शकते. कढीपत्त्यामध्ये भरपूर लोह असते, जे अशक्तपणा दूर ठेवण्यास मदत करते. कढीपत्त्याचे तेल वापरल्याने केस जलद वाढण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, असे मानले जाते की ताज्या कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने मधुमेह देखील कमी होऊ शकतो. वजन कमी करण्यात देखील कढीपत्ता फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे तेल सॅलड, सूप, करी किंवा इतर आहारामध्येही वापरले जाऊ शकते.
जेवणात चव आणि सुगंधा वाढण्यासाठी स्वयंपाकाच्या तेलात औषधी वनस्पती घटक मिसळले जातात. तज्ज्ञांच्या मते, कढीपत्त्याच्या तेलाचा वापर केल्याने तुमचे नियमित जेवण अधिक स्वादिष्ट आणि निरोगी बनू शकते. कढीपत्त्याच्या तेलाचा वापर खिचडी, हमस, सलाद, पिझ्झा आणि इतर घरगुती पदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
कढीपत्त्याचे तेल मुळात कोणत्याही तेलात ताजा कढीपत्ता मिसळून बनवता येते. साधारणत: हे तेल शुद्ध नारळाचे तेल आणि ताजा कढीपत्ता मिसळून बनवले जाते. तेलात कढीपत्ता घाला आणि व्यवस्थित गरम करा. तेल गरम होताच गॅस बंद करा आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर आपण एकतर तेल गळून वापरू शकता किंवा मिश्रित तेल देखील वापरू शकता. एका काचेच्या कंटेनरमध्ये हे तेल साठवून ठेवू शकता आणि कधीही वापरू शकता. हे तेल विविध पदार्थांची चव आणखी वाढवेल.
(Health benefits of Curry leave infused oil know how to make these oil)
तुमच्या ‘या’ चुकांमुळेच केस होतात अकाली पांढरे! जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाल
लिंबू आणि संत्र्याचा आहारात समावेश करा, सुंदर त्वचा आणि चमकदार केस मिळवा!