मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कांद्याचे (Onion) सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे कांदा फक्त आरोग्यासाठी नव्हेतर आपल्या केसांसाठी (Hair) खूप जास्त फायदेशीर आहे. कांदा केसांच्या अनेक समस्या देखील दूर करतो. वरण, भाज्या, भजी, बेसन, आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये (Foods) कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामध्येही कांदा भजी म्हटंले की, सर्वांचाच तोंडाला पाणी येते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर कांद्याची बारीक पेस्ट तयार करून त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून ते कैरीला लावून खाण्याची मज्जाच वेगळी आहे.
आपण सर्वजण कांदे एकदाच मोठ्या प्रमाणात घरी आणतो. कारण किचनमध्ये कांदा अशी गोष्ट आहे की, ती दररोज लागतेच. मात्र, बऱ्याच वेळा आपण पाहिले असेल की, कांद्याला ठेवलेल्या जागीच अंकुर फुटतात आणि कांद्याची पात वर येते. लोकांना असे वाटते की, हा कांदा खराब झालेला आहे आणि ते अशाप्रकारचे कांदे सरळ फेकून देतात. मात्र असे अजिबात करून नका. कारण हा अंकुर फुटलेला कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो.
संबंधित बातम्या :
Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!
Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!