मुंबई : उन्हाळ्यात (Summer) इच्छा नसताना देखील कामानिमित्त आपल्या सर्वांनाच घराच्या बाहेर पडावे लागते. या ऋतूत होणारा उष्माघात हा आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी (Skin) अत्यंत हानिकारक असतो. काही लोक उष्माघाताचे बळी ठरतात. प्रश्न पडतो की उष्माघातापासून कसे दूर राहवे. आरोग्य तज्ज्ञाच्या मते उष्माघातापासून दूर राहण्यासाठी सर्वांत महत्वाचे आहे आपला आहार. या हंगामामध्ये आपल्या आहाराची (Food) अधिक काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. मजबूत प्रतिकारशक्तीमुळे आपण अनेक समस्या टाळू शकतो. त्यापैकी एक म्हणजे उष्माघात आहे. उष्ण हवेचा शरीरावर वाईट परिणाम होतो. शरीराचे तापमान वाढू लागते. अशा स्थितीत मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होतात.
उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असते. आयुर्वेदानुसार, या काळात अशा पदार्थांचे सेवन करणे चांगले मानले जाते, ज्याचा थंड प्रभाव पडतो. काकडी, कलिंगड, सत्तू आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करून तुम्ही स्वतःला थंड ठेवू शकता. मात्र, या गोष्टी फक्त एकदा खाऊन चालत नाहीतर तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये याचा समावेश करणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी बेलच्या सरबताचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात ते औषधाचे काम करते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात हे जास्त प्रमाणात पिले जाते. यामुळे या हंगामामध्ये ग्रामीण भागातील लोक जास्त आजारी पडत नाहीत. त्यात व्हिटॅमिन सी आणि फायबर सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. फायबरमुळे तुमचे पोट निरोगी राहते.
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये गिलोयचे सेवन देखील फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, हे आयुर्वेदिक औषध आहे, जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील तीन दोष, वात, पित्त आणि कफ हे गिलोयने नष्ट होऊ शकतात. वात हा वायुशी संबंधित आहे आणि बहुतेक लोकांना उन्हाळ्यात या दोषाचा सामना करावा लागतो.
संबंधित बातम्या :
Hair | केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा!
Skin Care Tips : त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!