Health care : आहारात ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा आणि निरोगी जीवन जगा! 

| Updated on: Nov 19, 2021 | 2:21 PM

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांशी झगडत आहेत. यामुळेच प्रत्येकजण फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. धावण्यापासून योगापर्यंत प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत काही बदल केले आहेत.

Health care : आहारात या 5 गोष्टींचा समावेश करा आणि निरोगी जीवन जगा! 
आहार
Follow us on

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात लोक अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांशी झगडत आहेत. यामुळेच प्रत्येकजण फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. धावण्यापासून योगापर्यंत प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत काही बदल केले आहेत. बरेच लोक त्यांच्या फिटनेसबद्दल इतके जागरूक असतात की ते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामशाळेसह जॉगिंगसाठी जातात. काही लोक जिममध्ये न जाता केवळ धावून आपले वजन नियंत्रित करतात.

धावण्याने वजन तर कमी होतेच, पण अनेक प्रकारच्या शारीरिक समस्याही दूर पळतात. अशा स्थितीत धावणाऱ्यांना झटपट ऊर्जा देणाऱ्या अन्नाची गरज असते. जे धावतात त्यांनी विशेष पौष्टिक घटक असलेल्या अन्नाकडे लक्ष दिले पाहिजे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि तुम्‍हाला झटपट ऊर्जा देतात.

1. लिंबू

लिंबूमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी दोन्ही मुबलक प्रमाणात असते. जे तुमचे शरीर निरोगी ठेवते आणि तुमची हाडे देखील मजबूत बनवते. जर तुम्ही रोज धावत असाल तर लिंबाचे सेवन जरूर करा. ते तुमच्या अन्नात किंवा पाण्यासोबत घ्या.

2. केळी

वर्कआउट करणार्‍यांसाठी केळी सर्वात आरोग्यदायी आहे. केळ्यामुळे पोट लवकर भरते आणि त्यासोबत तुम्हाला झटपट एनर्जी मिळते. केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 मुबलक प्रमाणात आढळते. हे तुमच्या रक्तातील साखरेवरही नियंत्रण ठेवते. अशा परिस्थितीत व्यायाम करणाऱ्यांनी केळीचे सेवन नक्कीच करावे.

3. अक्रोड

अक्रोडमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, फायबर, व्हिटॅमिन ई आणि इतर अनेक पोषक घटक असतात. अक्रोडच्या सेवनाने तुमची हाडे मजबूत होतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि जे व्यायाम करतात त्यांनी अक्रोड जरूर खावे.

4. चिया बिया

चिया बियांमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात. तसेच कॅल्शियम, लोह आणि प्रथिने असतात. त्यांना पाण्यात भिजवून सेवन केल्याने भरपूर पाणी शरीरात पोहोचते. याच्या सेवनामुळे धावणाऱ्या लोकांच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही.

5. चेरी

चेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. यामुळे शारीरिक वेदना कमी होतात आणि सूज कमी होण्यास मदत होते.धावणाऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!