पावसाळ्यात नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळतो. मात्र पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोकाही वाढतो. पावसाळ्यात प्रत्येक व्यक्ती सर्दी, आणि तापाने त्रस्त असल्याचं दिसून येतं. पावसाळ्यातील थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. पावसाच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी, पावसाच्या दिवसात कोणत्या गोष्टी खाणं टाळावं हे जाणून घेऊया.
पालक
पालक, मेथी, वांगी, कोबी यासारख्या गोष्टी पावसाळ्यात खाऊ नयेत. आरोग्य तज्ञांच्या मते, पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका सर्वाधिक वाढतो. याशिवाय, पालेभाज्यांमध्ये किडे सहज वाढतात, त्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या भाज्या खाणे टाळावे.
दही
दही आणि दूध उत्पादन खाणं पावसाळ्यात टाळावं. कारण पावसाच्या दिवसात दह्यामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मासे
पावसाचे दिवस समुद्री जीव आणि माशांसाठी प्रजननाचा काळ मानला जातो. पावसाच्या दिवसात समुद्रातील पाणी प्रदूषित होते आणि ही घाण माशांना चिकटते. त्यामुळं मासे खाल्यासं अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत माशांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
कोथिंबीर
सॅलड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण या हंगामात कोणतीही कच्ची भाजी खाणे टाळावे. याशिवाय कापलेली फळे आणि भाज्या खाणे हानिकारक आहे.
स्ट्रीट फूड आणि तळलेल्या गोष्टी खाणं पावसाळ्यात टाळाव्यात. पावसाच्या दिवसात उघड्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच डॉक्टर स्ट्रीट फूड खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. या व्यतिरिक्त, या गोष्टी तुमच्या पचनसंस्थेच्या कामावरही परिणाम करतात. पावसात पकोडे, समोसे वगैरे खाणे टाळणं आवश्यक आहे.
पावसाच्या दिवसात पचन प्रक्रिया मंदावते. डॉक्टर बाहेरच्या गोष्टी खाणे टाळण्याचा सल्ला देतात. या हंगामात मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.
इतर बातम्या:
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता!
Health Tips to Avoid these food in monsoon to fight from diseases check details here