मुंबई : शरीराला आतून थंड आणि निरोगी ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. या हंगामात, बरेच लोक स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक पेयांचे सेवन करतात. यात सरबत, शेक आणि स्मूदी या सारख्या अनेक पेयांचा समावेश आहे. ही पेये प्यायल्यानंतर तुम्हाला एकदम रीफ्रेश वाटेल. या काळात फळांव्यतिरिक्त आपण इतर अनेक देसी पेय ट्राय करू शकता. या पेयांबद्दल खास गोष्ट अशी आहे की, ती फार लवकर तयार करता येतात. चला तर, जाणून घेऊया अशी कोणती पेय आहेत…(Healthy drinks to stay cool and healthy during hot weather)
देसी जलजीरा हे उत्तर भारतातील लोकप्रिय पेय आहे. जिरेपूड, चिंच किंवा आमचूर (कच्चा आंबा) पावडर, मिरपूड, काळे मीठ, बडीशेप आणि थंड पाण्याने आपण हे पेय बनवू शकता. यात तुम्ही पुदीन्याची पाने आणि थोडी बुंदी देखील घालू शकता. या सर्व गोष्टी आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यामध्ये सहज उपलब्ध असतात. आपण हे मसालेदार आणि चटपटीत पेय घरच्या घरी बनवू शकता.
भारतात लिंबू वर्षभर उपलब्ध असतो. लिंबू हा व्हिटामिन सीचा चांगला स्रोत आहे. लिंबू उन्हाळ्यात एक थंडावा आणि समाधान देणारा, तसेच तृष्णा शांत करणारा घटक ठरतो. यासाठी, थंड पाण्यात लिंबू पिळून त्याचा रस तयार करावा. आपण इच्छित असल्यास त्यात पुदीन्याची पाने टाकू शकता. तसेच, त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घाला. काही लोक साखर घालत नाहीत. हा हायड्रेशनचा एक चांगला स्रोत आहे.
दह्यापासून बनवलेल्या लस्सीला बर्याच नावांनी ओळखले जाते. पंजाब आणि उत्तर भारतात ही लस्सी आहे, तर गुजरातमध्ये ‘मठ्ठा’ म्हणून ओळखले जाते. हे पेय तयार करण्यासाठी दही, पाणी आणि साखर याची गरज असते. काही लोक साखरेऐवजी मीठ वापरतात. आपण गोड लस्सीत आणखी बरेच स्वाद मिसळू शकता – जसे आंबा लस्सी, ड्राई फ्रूट्स लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी आणि मलाई लस्सी…
सत्तू हे बिहारचे एक लोकप्रिय कोल्ड ड्रिंक आहे. हे भाजलेली हरभरा पावडर आणि गहू पावडरपासून बनवले जाते. हे आपल्या पोटासाठी अत्यंत पौष्टिक आणि निरोगी पेय आहे. सत्तू पेय तयार करण्यासाठी, 1.5 लिटर थंड पाणी घ्या, 6 चमचे सत्तू (भाजलेले हरभरा पीठ) आणि 4 ते 6 चमचे साखर किंवा गूळ घाला. चवीनुसार थोडे मीठ घाला. अशा प्रकारे सत्तू पेय तयार होईल.
(Healthy drinks to stay cool and healthy during hot weather)
Protein Deficiency Symptoms : प्रोटीनची शरीरात कमतरता असल्याची ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे !