मुंबई : हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables) खा, असं डॉक्टर वारंवार सांगतात. पालेभाज्या फेश असतील तर त्यांचा शरीरावर परिणाम होतो. काही भाज्या विशिष्ट ऋतूमध्ये मिळतात. ऋतू संपला तरी बऱ्याचदा हिरव्या भाज्या मिळत नाहीत. अश्यावेळी आपण जर त्यांची साठवणूक केली तर आपण वर्षभर पालेभाज्यांचा आस्वाद घेऊ शकतो. मेथीची भाजी (Fenugreek Vegetable) अनेकांना आवडते. ती आरोग्यासाठीही लाभदायक असते. मेथीला चांगल्या प्रकारे साठवून ठेवून तुम्ही त्याचा चांगल्याप्रकारे आस्वाद घेऊ शकता. मेथी 10-12 दिवस ते वर्षभर ताजी राहू शकते. शिवाय त्यांची चव बदलत नाही.
फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी
मेथी फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवण्यासाठी तिला 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे मेथीच्या पानांमध्ये अडकलेली धूळ आणि माती निघून जाईल. आता मेथी चांगली कोरडी करून घ्या. त्यानंतर ते बारीक चिरा. मेथी वर्षभर साठवून ठेवायची असेल तर त्याचे देठ काढून टाका. यानंतर, बारीक चिरलेली मेथी झिपलॉक प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा आणि पिशवी फ्रीजरमध्ये ठेवा. अशा प्रकारे मेथी साठवून ठेवता येते.
15 दिवस फ्रेश मेथी
जर तुम्हाला मेथी 15 दिवसांसाठी असेल तर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यासाठी आधी देठासह मेथीची पाने तोडून बाजूला ठेवावी लागतील. ही मेथीची पाने पाण्याने धुण्याची गरज नाही. मेथी पेपर टॉवेलमध्ये चांगली पॅक करा. नंतर पेपर टॉवेल प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा आणि पिशवीतून हवा पूर्णपणे बाहेर काढा. मग ही पिशवी बंद करून हवाबंद डब्यात ठेवा. आता तुम्ही हा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून ते काही दिवस ताजे राहील.
वर्षभरासाठी साठा
मेथी सुकल्यानंतरही बराच काळ साठवता येते. पण मेथी साठवल्यावर त्याची चव काही प्रमाणात बदलते, पण खराब होत नाही. मेथीची पाने सुकविण्यासाठी प्रथम 3-4 वेळा पाण्याने धुवा आणि पानांमध्ये अडकलेली सर्व माती स्वच्छ करा. यानंतर पाने सुकवून घ्या, यासाठी तुम्ही सुती कापडाने पाने झाकून उन्हात ठेवू शकता. ही पाने फक्त 2 दिवसात सुकतात आणि मग तुम्ही वाळलेली पाने हवाबंद डब्यात ठेवू शकता. ही पाने तुम्ही कोणत्याही भाजीत किंवा पराठ्यात वापरू शकता.
टीप- टीव्ही 9 मराठी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही.
संबंधित बातम्या