मुंबई : आपल्या सर्वांच्या घरात तूप वापरले जाते. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुपामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात, जे शरीरातील पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. पण जास्त तूप खाल्ल्याने अतिसार आणि चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे चयापचय क्रिया संथपणे काम करते. यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि लठ्ठपणा वाढतो.
देशातच नव्हे तर जगाच्या विविध भागात शुद्ध तुपाला मोठी मागणी आहे. लोण्यासाठी हा एक निरोगी पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रमाणात तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पूर्णपणे तुमच्या आहारावर अवलंबून आहे, जर तुम्ही आहारात जास्त धान्ययुक्त पदार्थ खात असाल, तर तूप अधिक वापरावे. पण जर तुम्ही डाळ आणि भात जास्त खात असाल, तर तूप वापर कमी वापरा. जर तुमचे बाळ सात महिन्यांचे असेल तर, त्याच्या आहारात 4 ते 5 चमचे शुद्ध तूप मिसळा. पण, जर तो एक वर्षाचा असेल तर केवळ अर्धा चमचा तूपच घाला. तथापि, बाळाच्या आहारात बदल करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
तुपामध्ये लोण्यापेक्षा जास्त चरबी असते, कारण त्यात पाणी आणि दूध नसते. तथापि, तूप बनवण्यासाठी लोणी हळूहळू उकळले जाते आणि नंतर चरबी वेगळी होते. स्वयंपाकाव्यतिरिक्त, तूप आयुर्वेदात विविध आरोग्यविषयक आजारांना बरे करण्यासाठी वापरले जाते. तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि ओमेगा 3 फॅटी आम्ल असतात.
गाय आणि म्हशीच्या दुधापासून तूप बनवले जाते. तुम्ही कोणतेही दूध घेऊन त्यावर प्रक्रिया करून तूप बनवू शकता. बाजारात उपलब्ध तूप शुद्ध आणि रसायनमुक्त नसते, म्हणून शक्य असल्यास घरीच तूप बनवा. आपण त्वचा मऊ ठेवण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण त्वचेतील कोलेजेन वाढवण्यासाठी तुपाचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे त्वचा अधिक तरुण आणि चमकदार दिसते.
तज्ज्ञ म्हणतात की, तूप ओमेगा-3 फॅट आणि ओमेगा-6 फॅटने समृद्ध आहे आणि आपले वजन कमी करण्यासाठी हे घटक खूप चांगले ठरू शकतात. याव्यतिरिक्त, तूपातील ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आपल्या शरीरातील काही ‘इंच’ कमी करण्यात मदत करतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(How beneficial is pure ghee for health Learn more about it)
चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क केसांना लावा आणि समस्या दूर करा!
Sesame Oil : तिळाच्या तेलानी रोज त्वचेची मालिश करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Skin Care Tips : ग्लोइंग स्किनसाठी ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की वापरा!