मुंबई : वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना आपण काय खातो हे सर्वात महत्वाचे आहे. परंतु त्याच वेळी, आहार घेत असताना काही फळांचे सेवन आपण करतो आणि मग विचार करतो की, दुसर्या दिवशी लगेच आपले वजन कमी होईल. परंतु असे होत नाही, कारण आपण अशी काही फळे खातो, ज्यात जास्त प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यापेक्षा वाढण्याची अधिक शक्यता असते. (If you want to lose weight, don’t eat bananas in your diet)
केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीती आहे. पण ही एक अशी गोष्ट आहे जी आपण जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही. केळी कॅलरींनी परिपूर्ण आहे आणि त्यात अत्यधिक नैसर्गिक साखर आहे. केळ्यामध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात, तर सुमारे 37.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. म्हणून, जर तुम्ही दररोज 2-3 केळी खाल्लीत तर वजन वाढण्याची शक्यता असते. काही लोक वजन कमी करण्यासाठी आपल्याला दररोजच्या आहारात केळीचा समावेश करतात.
यामुळे वजन कमी होण्यापेक्षा अधिक होते. ज्या लोकांना आपले वजन झटपट कमी करायचे आहे. अशांनी केळी खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. उपाशी पोटी केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. केळी उपाशी पोटी खाल्ल्याने मायग्रेनच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. असेही म्हटले जाते की, केळी चुकीच्या वेळी खाल्ल्यास, आपल्या रक्तातील खनिजे कमी होतात. केळीमध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
पचनासाठी सगळ्यांत चांगली केळी ही पिवळी आणि ज्याच्या सालीवर तपकिरी रंगाचे छोटे छोटे ठिपके असतात. ती केळी सगळ्यात चांगली असते. केळ्यामध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारात केळी घेणे टाळावेच.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(If you want to lose weight, don’t eat bananas in your diet)