मुंबई : आवळा खाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा हे एक सुपर फूड आहे. जे अनेक रोगांपासून आपले स्वंरक्षण करण्यास मदत करते. यामुळे तुमची पचनशक्ती चांगली होण्यास देखील मदत होते. तुम्ही आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाऊ शकता. जे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या हंगामात आपण आवळ्याचा रस पिवून अनेक रोग आपल्यापासून दूर ठेऊ शकता.
आवळ्याचे आरोग्य फायदे
आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आवळा त्याच्या औषधी गुणांसाठी ओळखला जातो. हे संसर्ग, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या समस्या दूर ठेवते. त्यामुळे केस गळणे देखील कमी होते.
आवळ्याला आयुर्वेदात अमलकी असे देखील म्हणतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते. आवळा साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. क्रोमियममुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. ताज्या आवळ्याच्या सेवनाने इन्सुलिन सुधारते. अशा प्रकारे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
आवळ्याचा आहारामध्ये समावेश करण्याचा मार्ग
तुम्ही 1 चमचे आवळा पावडर 1 चमचे मध किंवा कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. आवळ्याचा रस सकाळी कोमट पाण्यात मिसळून सेवन केल्यास फायदा होतो. आवळा हा च्यवनप्राशचा मुख्य घटक आहे. तुम्ही 1 चमचा च्यवनप्राश कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर दोन तासांनी घेऊ शकता. या हिवाळ्यात बाजारातून ताजी आवळे घेऊन तुम्ही आवळा मुरब्बा किंवा लोणचे बनवू शकता.
हिवाळ्याच्या दिवसात चहा प्यावा असे सर्वांनाच वाटते. अशावेळी चहात आवळ्याचा वापर करुन पाहा. एक आवळा, आले आणि दालचिनी टाकून हा चहा बनवू शकता. या सर्व गोष्टी आपल्या शरीराला आतून उबदार ठेवतील. यासाठी चहा बनवण्याच्या भांड्यात अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा तुकडा दालचिनी, 1 चिरलेला आवळा आणि थोडासे पाणी घालून साधारण 10 मिनिटे उकळवा. या चहात चवीनुसार किंवा अर्धा चमचा गूळ घालू शकता.
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include amla in the diet to boost the immune system)