Health Tips : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुपाचा आहारात समावेश करा, वाचा अधिक!

| Updated on: Sep 13, 2021 | 2:25 PM

निरोगी आहार आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. निरोगी आहाराचा ज्यावेळी विषय येतो तेंव्हा प्रत्येकाला तुपाची आठवण होते. हे दुग्धजन्य पदार्थांपासून बनवले जाते. त्याचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत. तुपामध्ये निरोगी फॅटी अॅसिड असते.

Health Tips : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुपाचा आहारात समावेश करा, वाचा अधिक!
तूप
Follow us on

मुंबई : निरोगी आहार आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. निरोगी आहाराचा ज्यावेळी विषय येतो तेंव्हा प्रत्येकाला तुपाची आठवण होते. हे दुग्धजन्य पदार्थांपासून बनवले जाते. त्याचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत. तुपामध्ये निरोगी फॅटी अॅसिड असते. यात जीवनसत्त्वे ए, के, जी, कॅल्शियम आणि ओमेगा -3 भरपूर असतात. तुपामध्ये पौष्टिक घटक असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात आणि रोग दूर ठेवतात. तुपाचे फायदे जाणून घेऊयात. (Include ghee in your diet to stay fit and healthy)

तूपाचे प्रकार

नियमित तूप – तूप म्हैस किंवा गाईचे दूध वितळवून बनवले जाते.
ए 2 तूप – हे तूप प्रामुख्याने गीर गाय आणि लाल सिंधीच्या दुधापासून बनवले जाते.
बिलोना तूप – तूप बनवण्याची सर्वात पारंपारिक पद्धत. हे देसी गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप असते.

तुपाचे फायदे

1. एक चमचा तूप आणि काळी मिरी मिसळून एक ग्लास हळद दुध प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. हे बद्धकोष्ठता दूर करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

2. याशिवाय, तूप चयापचय सुधारण्यास मदत करते. हे तुमचा मूड सुधारते आणि ऊर्जा देण्यास मदत करते.

3. तूप हे ब्युटीरिक अॅसिडचे मुख्य स्त्रोत आहे. हे आपल्या शरीरात प्रोबायोटिकसारखे कार्य करते.

4. तुपात व्हिटॅमिन के 2 असते. जे हाडे आणि सांध्यातील कॅल्शियम शोषण्यास मदत करते.

5. तूप कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तातील साखर राखण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, यामुळे भूक कमी होते.

6. तुपामध्ये हळद आणि काळी मिरी मिक्स केल्याने दाह आणि ताण कमी होण्यास मदत होते. तसेच तुमची झोप सुधारते.

हे सर्वात महत्वाचे

एक चमचे किंवा 5 ग्रॅम तुपामध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट असतात. तुपामध्ये डाळी आणि भाज्या शिजवणे सर्वात फायदेशीर आहे. परंतु लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, हृदय आणि पीसीओएसने ग्रस्त लोकांनी तूप खाण्यापासून दूर राहावे. निरोगी व्यक्ती 3 ते 4 चमचे तूप वापरू शकते. सक्रिय जीवनशैली आणि उष्मांकानुसार तुपाचे सेवन केले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include ghee in your diet to stay fit and healthy)