Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा !

| Updated on: Jun 21, 2021 | 10:43 AM

अननस खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसच्या सेवनामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. अननसामध्ये भरपूर प्रमाणात पोषण घटक असतात.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा !
अननस
Follow us on

मुंबई : अननस खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसच्या सेवनामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. अननसामध्ये भरपूर प्रमाणात पोषण घटक असतात. अननस तुम्हाला केवळ हायड्रेटेड ठेवत नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करते. वजन कमी करण्यासाठी अननस कसे फायदेशीर आहे ते बघूयात. (Include Pineapple in the diet to lose weight)

अननसमधील पोषक – अननसमध्ये पुष्कळ पोषक आणि एन्झाईम्स असतात. अननस खाल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. ते शरीराला ताजे ठेवण्याचे कार्य करते. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी अननसाचा आहारात समावेश करा. अननसमध्ये ब्रोमेलेन असते. हे एंटी-इंफ्लेमेटरी एंझाइम आहे.

फायबरचा चांगला स्रोत – अननस आपल्या पोटासाठी चांगले आहे. हे फायबरने समृद्ध आहे आणि म्हणून पचन करण्यास मदत होते. आपण आपले पाचन आरोग्य सुधारण्यासाठी अननसचे सेवन करू शकता. हे आपल्याला पोटातील आजारांपासून वाचविण्यात मदत करेल. तुमची चयापचय वाढवण्यासाठी फायबरही उत्तम आहे.

कमी कॅलरी – अननसची चव आंबट असते. मात्र, अननस खाल्याने बराच वेळ भूक लागत नाही. ज्यावेळी आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते, अशावेळी आपण अननस खाल्ले पाहिजेत.

व्हिटॅमिन सीचा स्त्रोत – अननसमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहेत. व्हिटॅमिन सी फ्लूपासून संरक्षण करते.

संधिवात – वृद्धावस्थेत संधिवात एक सामान्य समस्या आहे. यावेळी सांधे सुजतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे जळजळ आणि संधिवात असलेल्या लोकांना वेदना पासून आराम मिळतो.

हाडांसाठी फायदेशीर – अननस कॅल्शियम आणि मॅंगनीज यासह अनेक पोषक द्रव्यांचा समृद्ध स्त्रोत आहे. हे पोषक ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करतात यामुळे मजबूत होतात.

त्वचा – व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन समृद्ध असलेले हे फळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. आपण ते खाऊ शकता किंवा त्वचेवर थेट लावू शकता. हे सूर्याच्या हानिकारक किरणांविरूद्ध लढण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यास आणि त्वचा सुधारण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Include Pineapple in the diet to lose weight)