Weight loss Tips : वजन कमी करायचंय?, ‘या’ 3 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटक्यात रिझल्ट मिळवा

| Updated on: Jun 23, 2021 | 3:44 PM

आपल्यातील बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट करत असतील. डाएट प्लॅनमध्ये चरबी, कर्बोदके आणि साखर कमी असते. मात्र, डाएटवर असलेल्या लोकांना गोड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते.

Weight loss Tips : वजन कमी करायचंय?, या 3 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटक्यात रिझल्ट मिळवा
वजन कमी करण्यासाठी टिप्स
Follow us on

मुंबई : आपल्यातील बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट करत असतील. डाएट प्लॅनमध्ये चरबी, कर्बोदके आणि साखर कमी असते. मात्र, डाएटवर असलेल्या लोकांना गोड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते. ज्यामुळे भूकही जास्त लागते. यामुळे वाढलेले वजन कमी करणे अवघड होते. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर आपण बॅंलेस डाएट घेतला पाहिजे. (Include these 3 foods in your diet to lose weight)

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर यांनी डाएड करत असताना गोड पदार्थ खाण्याचे तल्लफ कशी दुर करायची यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. भूक आणि क्रेविंग यात फरक आहे. जर आपण गेल्या काही तासांपासून काही खाल्ले नाही तर आपल्याला भूक लागते. क्रेविंग म्हणजे आपल्याला त्वरित काहीतरी खाण्याची इच्छा होते.

न्यूट्रिशनिस्ट रुजुता यांच्या मते, जेंव्हा आपल्याला भूक लागते, तेंव्हा आपण पोट भरण्यासाठी खातो आणि क्रेविंग ही आपल्या मुडप्रमाणे असते. क्रेविंग ही एक वाईटजीवनशैलीची सवय आहे. क्रेविंगच मुख्य कारण म्हणजे ब्लोटिंग, डिहायड्रेशन आणि खराब झोप हे असू शकते. क्रेविंग समस्या दूर करण्यासाठी आपण आहारात या तीन गोष्टींचा समावेश केला पाहिजे.

लोणचे

बहुतेक लोकांना तिखट आणि मसालेदार अन्न खायला आवडते. घरी तयार केलेल्या लोणच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. लोणचे हे चांगल्या जीवाणूंचा मुख्य स्त्रोत आहे, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय हे साखरेच्या क्रेविंगवर नियंत्रण ठेवून पाचक प्रणाली मजबूत करण्यास मदत करते.

डाळी

रुजुता आहारात विविध प्रकारच्या डाळींचा समावेश करण्याचा सल्ला देतात. डाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डाळी खाल्ल्याने आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला भूक देखील लवकर लागत नाही. विशेष म्हणजे डाळींचा आहारात समावेश केल्याने गोड खाण्याच्या क्रेविंगवर नियंत्रण ठेवता येते.

बाजरी

बाजरी हे ग्लूटेन मुक्त असते, जे पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण आहे. हे गव्हापेक्षाही पौष्टिक आहे आणि अंतर्गत प्रणालीसाठी बर्‍याच प्रकारे ते महत्वाचे आहे. रागी आणि ज्वार हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. जे आपण आपल्या आहारात सहज समाविष्ट करू शकता. आठवड्यातून दोनदा ज्वारीचा आहारात समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Include these 3 foods in your diet to lose weight)