मुंबई : डोळे (Eye) हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण जग फक्त आपल्या डोळ्यांनीच पाहता येते. डोळ्यांची दृष्टी कमजोर असल्यास आपल्याला नेहमी चष्मा किंवा लेन्स वापराव्या लागतात. जे कधीकधी खूप त्रासदायक (Annoying) असते. तुमची दृष्टी आधीच कमी आहे असे तुम्हाला कधी वाटत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमची दृष्टी सुधारू शकता. कोणते पदार्थ (Food) तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करू शकतात हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. यामध्ये ल्युटीन आणि व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी चांगले असतात आणि डोळ्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात. तुम्ही दररोज उकडलेले अंडी खाऊ शकता किंवा दोन अंड्याचे आॅम्लेट देखील सकाळच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकता.
चिरलेली गाजर तुम्ही सॅलडमध्ये म्हणून खाऊ शकता. ते तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन देखील असते जे डोळ्यांना संसर्गापासून वाचवते. डोळ्यांचे कार्य सुधारण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी अॅसिड असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या न्याहारीमध्ये नट्ससारखे नट खाऊ शकता. काही नटांमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खावेत.
जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात माशांचा समावेश जरूर करा. त्यात भरपूर ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, जे गंभीर परिस्थितींपासून संपूर्ण संरक्षण करतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही फिश ऑइल सप्लिमेंट्स वापरू शकता.
आपल्या डोळ्यांसाठी फळे देखील खूप जास्त फायदेशीर असतात. यामुळे आपल्या आहारामध्ये फळांचा देखील समावेश करा. तसेच फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आपली दृष्टी वाढवण्यासाठी फळाचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे.