मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अतिशय महत्वाचे झाले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे व्हिटॅमिन सी’ आहे. आपण जर दररोजच्या आहारात व्हिटॅमिन सी घेतले तर कोरोनाच काय दुसरे कोणतेही आजार आपल्याला होणार नाहीत. शरीरामध्ये व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ आहारात घेतले पाहिजेत. हे आज आपण बघणार आहोत. (Include these foods with vitamin C in your diet)
लिंबू, संत्री आणि मोसंबी
लिंबू, संत्री आणि मोसंबी यांच्या समावेश आपल्या आहारात करा. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते.
ब्रोकोली आणि पालक
ब्रोकोली ही एक आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदेशीर भाजी आहे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर समृद्ध असलेले अन्न पाचन तंत्रामध्ये सुधारणा करण्यास मदत करते, विशेष म्हणजे ब्रोकोलीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, पालक या हिरव्या भाज्यामध्ये फायबर आणि फॉलेट, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम सारखे इतर पोषक घटक असतात.
स्ट्रॉबेरी आणि लीची
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यात सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे. लीचीमध्ये व्हिटॅमिन सी, रायबोफ्लेविन, फोलेट, नियासिन आणि बीटा कॅरोटीन असते. लीचीचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पपई आणि पेरू
पपईमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. पपईचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. पपई दररोज निश्चित प्रमाणात खाऊ शकतो. पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरू हा व्हिटॅमिन ए सीचा मोठा स्त्रोत आहे. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात.
लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरचीमध्ये जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लाल शिमला मिरचीमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते.
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(Include these foods with vitamin C in your diet)