मुंबई : जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी (Health) ठेवायचे असेल तर तुम्हाला नियमित हेल्दी आहार घेणे आवश्यक आहे. हे अन्न आपल्या उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. म्हणूनच खाणे खूप महत्वाचे आहे. मात्र, आपण दिवसभरात काय खातो, कोणत्या वेळी खातो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. पण अन्नाचे पौष्टिक मूल्य देखील खूप महत्वाचे आहे. खायला सगळ्यांनाच आवडते. मात्र फक्त गोड पदार्थ, जंक फूड (Junk food) किंवा तळलेले पदार्थ आवडतात, पण या पदार्थांमुळे आपले शरीर (Body) अजिबात निरोगी राहत नाही.
कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, मधुमेह यांसारख्या समस्यांबरोबरच वजन वाढणे, लठ्ठपणाच्या समस्या जंक फूडमुळे होण्यास सुरूवात होते. म्हणूनच आपल्या दररोजच्या आहारामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणे खूप जास्त महत्वाचे आहे. जेवणाची वेळ आणि आपण अन्नामधून किती कॅलरीज घेतो आहे हे अत्यंत महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त अन्नामध्ये पौष्टिक मूल्य असणे आवश्यक आहे. तज्ज्ञ नेहमीच संतुलित आहारावर भर देत असतात. यामुळेच आपण किती खातो यापेक्षा आपण काय होतो हे अत्यंत महत्वाचे आहे.
-कॅलरीज सतत मोजत राहा. शरीराला आवश्यक तेवढ्या कॅलरीज खा. परंतु तुम्ही जेवढा कॅलरीज घेतल आहात तेवढ्या तुम्हाला बर्न कराव्या नक्कीच लागतील.
-निरोगी आणि संतुलित आहार घ्या. तुम्ही खात असलेल्या अन्नामध्ये पुरेशी पोषक तत्वे असल्याची खात्री करा. जंक फूड तर खाणे टाळाच.
-तुम्हाला पुरेसे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळत असल्याची खात्री करा. तसेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स पण ठेवायला विसरू नका. तसेच भाज्या, प्रथिने, धान्ये, दुग्धजन्य पदार्थ खा.
-प्रथिनांपेक्षा अधिक भाज्या प्रथिने खा. बीन्स, विविध भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. चिकन, अंडी, मासे नियमित खा. पण रेड मीट अजिबात नाही. खाणे कितीही चांगले असले तरी ते सोडून दिले पाहिजे.
-रोजच्या आहारात फळांचा समावेश जरूर करा. विविध हंगामी फळे खा. फळांचे ज्यूस देखील तयार करून आहारात घ्या. तसेच स्नॅक म्हणून फ्रूट सॅलड खा.
-भाज्यांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. भाजी अँटिऑक्सिडंट्सचा मुख्य स्त्रोत आहे. आणि म्हणून यादीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, ब्रोकोली, मटार समाविष्ट करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी वापरा दह्याचा फेसपॅक, ‘असा’ बनवा फेसपॅक घरच्या घरी
Weight Lose Tips : ‘या’ चार फळांचा आहारात समावेश करा आणि वजन घटवा!