मुंबई : उन्हाळ्यात (Summer) वाढत्या तापमानामध्ये घराबाहेर पडणे अशक्य होते. कडक उन्हामुळे आणि घामामुळे लोक इतर हंगामापेक्षा लवकर थकतात. तसेच या हंगामात आरोग्याच्या अनेक समस्या देखील निर्माण होतात. अशा परिस्थितीत, आपल्या आरोग्याची अधिक काळजी (Care) घेणे आवश्यक आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या थंड पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ते उष्णतेपासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करतात. ते हायड्रेटेड (Hydrated) ठेवतात. विशेष म्हणजे हे पदार्थ थकवा दूर करतात. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात तुम्ही कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता आणि तुमचा थकवा देखील कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात मटक्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात फ्रिजच्या पाण्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही मटक्यातील पाणी पिले तर आरोग्य निरोगी राहिल. मटक्यातील पाणी तुमच्या पचनासाठी फायदेशीर आहे, ते शरीराचे तापमान कमी करून उष्माघाताचा धोका कमी करण्यास देखील मदत करते. मटक्याच्या पाण्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळेच मटक्यातील पाणी बाराही महिने पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सत्तूमध्ये भरपूर प्रोटीन असते. सत्तूचे सेवन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहते. तुम्ही सत्तू सिरपचे सेवन करू शकता. हे शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचे काम करते. उष्णतेवर मात करण्यासाठी हे एक उत्तम अन्न आहे. तुम्ही अनेक प्रकारे सत्तुचा आहारामध्ये समावेश करू शकता. तुम्ही सत्तुचा ज्यूस देखील आहारामध्ये घेऊ शकता. सत्तुमुळे निरोगी राहण्यास मदत होते.
दुधी भोपळ्याची खीर अनेकांना खायला प्रचंड आवडते. मात्र, तेच दुधी भोपळ्याची भाजी खायची म्हटंले की, अनेकांचे नाक वाकडे होते. दुधी भोपळ्याची भाजी लोकांना खायला आवडत नाही. मात्र, सध्याच्या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचे जास्तीत-जास्त पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्या. दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या आपल्यापासून दूर राहतात. दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.