Healthy Foods : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Mar 09, 2022 | 11:43 AM

कोरोना (Covid 19) असो किंवा नसो आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असणे ही काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळातमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठे बदल झाल्याचे आपण सर्वांनीच बघितले आहे. मास्क लावून फिकणे, वेळोवेळी हात धुणे, निरोगी आहार आणि व्यायाम (Exercise) करून आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यावर सर्वांनीच भर दिला होता.

Healthy Foods : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करावा.
Follow us on

मुंबई : कोरोना (Covid 19) असो किंवा नसो आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असणे ही काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळातमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठे बदल झाल्याचे आपण सर्वांनीच बघितले आहे. मास्क लावून फिकणे, वेळोवेळी हात धुणे, निरोगी आहार आणि व्यायाम (Exercise) करून आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यावर सर्वांनीच भर दिला होता. मात्र, आता कोरोनाच्या केसमधील कमी झाली आणि परत एकदा लोकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. परंतू मित्रांनो…अजूनही कोरोना गेलेला नाहीये, यामुळे आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

  1. ब्रोकोली- ब्रोकोलीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, ई, फायबर आणि इतर अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच आपल्या रोजच्या आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.
  2. फळे- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोसंबी, लिंबू, द्राक्ष यासारख्या लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन देखील वाढवते. ते संसर्गाशी लढतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश करा.
  3. आले- आले जळजळ कमी करण्यास मदत करते. हे घसा खवखवणे आणि दाहक रोगांपासून मुक्त होण्यास मदत करते. हे मळमळ टाळण्यासाठी देखील मदत करते. हे जुनाट वेदना कमी करते. त्यात कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म आहेत. जर आपल्याला सर्दी आल्यासारखे वाटत असेल तर मस्त गरमा-गरम आल्याचा चहा प्या. यामुळे आराम मिळण्यास मदत होते.
  4. हळद- हळद दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर दूधामध्ये हळद मिक्स करून देखील पिऊ शकतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  5. लाल शिमला मिरची- लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन जास्त प्रमाणात असते. बीटा कॅरोटीनचे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते. हे आपले डोळे आणि त्वचा निरोगी ठेवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचाही चमकदार बनते. आपण सलादमध्ये किंवा भाजी करूनही शिमला मिरची खाऊ शकतो.
  6. लसूण- लसूण कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करते. हे जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठी अनेक फायदेही देते. त्यात असे गुणधर्म आहेत जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण लसणाचे लोणचे देखील आहारात घेऊ शकता.

संबंधित बातम्या : 

मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

महिलांनो… या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!