मुंबई : लोह एक आवश्यक खनिज आहे. हे आपल्या शरीराची अनेक कार्ये पूर्ण करण्यासाठी मदत करते. लोहाची कमतरता शरीरात अनेक समस्या उद्भवू शकते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होऊ शकतो. लोहाच्या कमतरतेच्या काही लक्षणांमधे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा आणि नखे पिवळसर होणे, डोकेदुखी आणि जीभेवर सूज येणे ही लोहाची कमतरता असण्याची लक्षणे आहेत. लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. (Include these substances in the diet to increase the amount of iron in the body)
डार्क चॉकलेट – चॉकलेट बहुतेक सर्व मोठ्या आणि लहान लोकांना आवडते. आपण डार्क चॉकलेटचे अनेक प्रकारे सेवन करू शकता, जसे की शेक तयार करणे. डार्क चॉकलेटमध्ये लोह असते. शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण आहारात डार्क चॉकलेटचा समावेश करू शकतो.
पालक – पालक एक हिरवी पालेभाजी आहे. लोहासाठी पालक नेहमी खाण्याची शिफारस केली जाते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीच्या अधिक प्रमाणात सेवन करण्यासाठी आपण लिंबाचा रस घालून उकडलेल्या पालकांचे सेवन करू शकता. याशिवाय तुम्ही हे कॅप्सिकम बरोबर खाऊ शकता.
राजमा – राजमामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ असतात. त्यात लोह असते. लोहाची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही राजमाचा आहारात समावेश करू शकतात.
बीट – बीट अशक्तपणाशी लढण्यासाठी सेवन केले जाते. त्यात मॅंगनीज, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे आपले रक्तदाब आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी कार्य करते.
क्विनोआ – क्विनोआ हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यात लोह देखील असतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ते लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी फायदेशीर आहे.
डाळिंब – डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि इतर पौष्टिक पदार्थ असतात. अशक्तपणा असलेल्या लोकांना डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. हे फळ सतत खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Photo : रोग प्रतिकारकशक्ती वाढवायची आहे?, मग केळी आणि ओट्सची स्मूदी नक्की ट्राय करा
त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include these substances in the diet to increase the amount of iron in the body)