मुंबई : आपल्याकजे मिठाई आणि नमकीनमध्ये अनेक व्हरायटीज मिळतात. नुसते मिठाईचे नाव जरी ऐकले तरी देखील आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, या गोष्टी अन्नाची लालसा वाढवतात. पण ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी हे थोडे कठीण होते. वजन कमी करण्यासाठी साखर खाणे टाळले पाहिजे. (Include these sweets in your diet to lose weight)
कारण गोड पदार्थांमुळे आपले वजन झपाट्याने वाढते. जर तुम्हालाही मिठाई खाण्याची आवड असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण होते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोड पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे खाल्ल्यामुळे देखील तुमचे वजन वाढणार नाही.
शिरा
जर तुम्ही गोड पदार्थांचे चाहते असाल तर शिरा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. ही एक जुनी रेसिपी आहे. रव्यापासून शिरा तयार केला जातो. त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी -6, मॅग्नेशियम आणि लोह सारख्या पोषक असतात. रव्यामध्ये आहारातील फायबर असते. जे रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे शिरा खाल्ल्याने तुमचे वजनही वाढत नाही.
कमी कॅलरी फ्रूट सलाड
कमी कॅलरीच्या फळांचे सलाड संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये खाऊ शकतात. त्यात स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, काळी द्राक्षे, केळी, लो फॅट दही, पपई, मध, मीठ आणि काळी मिरी घाला. या सर्व गोष्टी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
जवसाचे लाडू
आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, जवस खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे फॅट बर्नसारखे काम करते. त्याची बियाणे प्रथिने आणि फायबर समृध्द असतात. वजन कमी करण्यासाठी, संध्याकाळी नाश्त्यात जवसाचे लाडू खा. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. या व्यतिरिक्त, ते अन्नाची लालसा देखील कमी करते.
चिक्की
संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही ड्राय फ्रूट चिक्की खाऊ शकता. हा एक निरोगी पर्याय आहे. भूक शांत करण्यासाठी तुम्ही दुपारी खाल्ल्यानंतर ड्राय फ्रूट चिक्की खाऊ शकता. चिक्कीमध्ये गूळ आणि ड्रायफ्रूट्स मिसळा. या दोन्ही गोष्टींमध्ये कॅलरीज कमी असतात.
गुळाची खीर
गुळ खीर बनवण्यासाठी कमी चरबीयुक्त दूध आणि गूळ वापरता येतो. या गोष्टींमध्ये कॅलरीज कमी असतात. म्हणूनच तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये गुळाची खीर खाऊ शकता.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include these sweets in your diet to lose weight)