Vegetable : ‘या’ भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!
वांग्याची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बरेच लोक वांग्याची भाज्या म्हटंले की, नाक वाकडे करतात. मात्र वांग्याच्या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. वांग्यात अनेक आरोग्यदायी घटक असतात. वांग्यात जीवनसत्त्वे अ, क आणि पॉलिफेनॉल असते.
Image Credit source: unsplash.com
Follow us on
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, भाज्या (Vegetables) खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेक भाज्यांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि रोगांपासून आपण दूर राहतो. भाज्या केवळ आपले शरीर निरोगी (Body healthy) ठेवत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. असे म्हणता येईल की भाज्या आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे औषध आहेत. तुम्ही नियमितपणे भाज्या खाऊ शकता आणि विविध शारीरिक समस्यांपासूनही दूर राहू शकता. भाज्याचा आहारामध्ये (Diet) समावेश केल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, किडनी या समस्या आपल्यापासून चार हात दूर राहतात. नेमक्या कोणत्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
खालील भाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर
मटार हे मुळात एक फळ आहे. त्यात भरपूर प्रथिने असतात. पण विशेषतः मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. रोज नाश्त्यात वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यासोबत आपण आहारामध्ये मटारच्या भाजीचा देखील समावेश करू शकतो, ही भाजी खाण्यासाठी खूप चवदार होते.
वांग्याची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बरेच लोक वांग्याची भाज्या म्हटंले की, नाक वाकडे करतात. मात्र वांग्याच्या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. वांग्यात अनेक आरोग्यदायी घटक असतात. वांग्यात जीवनसत्त्वे अ, क आणि पॉलिफेनॉल असते.
कारले खायला आवडणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. घरामध्ये कारल्याची भाजी म्हटंले की, कोणालाही आनंद होत नाही. मात्र, हेच कारले खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. कारल्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये शिमला मिरचीचा देखील नक्की समावेश करावा. लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे हृदयासाठी चांगलेच नाही तर वजन कमी करण्यासही मदत करते. यामुळे शिमला मिरचीचा आहारामध्ये समावेश करा.