Health Care : हिरव्या भाज्यांचं खास सूप आहारात समाविष्ट करा आणि निरोगी जीवनशैली जगा!

| Updated on: Sep 25, 2021 | 8:18 AM

बहुतेक आरोग्य तज्ञ निरोगी राहण्यासाठी या हिरव्या भाज्या खाण्याची शिफारस करतात. पण बहुतेक लोकांना या भाज्या खाण्यास जास्त आवडत नाहीत. विशेषत: लहान मुलांना बाजारातील मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाण्याची सवय लागते. यामुळे त्यांना या हिरव्या भाज्या खाण्यास आवडत नाहीत.

Health Care : हिरव्या भाज्यांचं खास सूप आहारात समाविष्ट करा आणि निरोगी जीवनशैली जगा!
सूप
Follow us on

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात भाजीपाला बाजारात फार मर्यादित असतो. या दिवसात मुख्यतः लाल भोपळा आणि दुधी भोपळा बाजारामध्ये आढळतो. या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात. जे पचण्यास सोप्पे आणि वजन वाढू देत नाहीत. (Include this special greens soup in your diet)

बहुतेक आरोग्य तज्ञ निरोगी राहण्यासाठी या भाज्या खाण्याची शिफारस करतात. पण बहुतेक लोकांना या भाज्या खाण्यास जास्त आवडत नाहीत. विशेषत: लहान मुलांना बाजारातील मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाण्याची सवय लागते. यामुळे त्यांना या भाज्या खाण्यास आवडत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण या भाज्या सूप म्हणून वापरू शकता.

हिरव्या भाज्यांचे फायदे

लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए (कॅरोटीन), व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स सारख्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. जर मुलांना नियमितपणे या भाज्या दिल्या तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास खूप चांगला होतो. त्याचबरोबर या भाज्यांमुळे सर्व गंभीर आजार कमी होण्यास मदत होते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आहारात या भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे सूप तयार करा

सामग्री

दोन मध्यम आकाराचे भोपळ्याचे पिस, अर्धा दुधी भोपळा, 5 ते 10 पालकची पाने, दोन गाजर, एक बीट, 4 टोमॅटो, आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, एक चिरलेला कांदा, दोन चमचे चिरलेली कोथिंबीर, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून काळे मीठ, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून ऑलिव तेल.

पद्धत

सर्वप्रथम सर्व भाज्या नीट धुवून त्याचे तुकडे करावेत. आता कुकरमध्ये तेल टाकून गरम करा. लसूण, कांदा, आले, चिरलेली हिरवी मिरची घालून दोन मिनिटे तळून घ्या. यानंतर टोमॅटो, भोपळा, दुधी भोपळा, पालक, गाजर आणि बीटरूट घाला आणि २-३ मिनिटे चांगले शिजवा.
यानंतर, त्यात साधे मीठ, हळद पावडर आणि मिरचीसारखे मसाले घाला आणि अर्धा ग्लास पाणी घाला आणि कुकर बंद करा आणि शिट्टी होऊद्या.

भाज्या उकळल्यावर त्यांना थंड करा आणि ब्लेंडरमध्ये बारीक करा. यानंतर, हे सूप चाळणीतून गाळून घ्या आणि आवश्यक असल्यास पाणी मिसळा. यानंतर, कढईत थोडे तूप किंवा लोणी घाला. नंतर हे सूप घालून ते उकळू द्या. शिजल्यावर त्यात काळी मिरी आणि काळे मीठ घाला आणि गरज झाल्यास थोडे लिंबूही घालू शकता. कोथिंबीरीने सजवलेले गरम गरम सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include this special greens soup in your diet)