मुंबई : दिवसाची सुरुवात हेल्दी (Healthy) करण्यासाठी आपला सकाळचा नाश्ता हा नेहमीच हेल्दी आणि चांगला असावा. जे सहज पचते अशाच पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यामध्ये (Breakfast) समावेश करायला हवा. त्याचबरोबर शरीराला आवश्यक पोषण मिळण्यासाठी लक्ष ठेवणे पाहिजे. म्हणून कमी चरबी, साखर आणि न तळलेले पदार्थ नाश्त्यामध्ये घेणे महत्वाचे आहे. जर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये तेलकट आणि गोड पदार्थांचा (Food) समावेश केलातर दिवसभर जळजळ होण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. तसेच यामुळे वजन वाढणे, कोलेस्ट्रॉलची समस्या, मधुमेह या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
सँडविच, टोस्ट, सॉस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा!
आपण बऱ्याच लोकांना बघितले असेल की, सकाळी नाश्त्यासोबत सॉसेज आणि बेक केलेल्या गोष्टींचा ते आहारामध्ये समावेश करतात. मात्र हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. नाश्त्यामध्ये नेहमीच सँडविच किंवा टोस्ट सॉससोबत खाल्ली तर शरीराच्या समस्या वाढतात. म्हणूनच अशा प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न सकाळी नाश्त्यामध्ये घेणे टाळा.
ब्लॅक कॉफी नाश्त्यामध्ये फायदेशीर, साखर, मलईदार कॉफी नकोच
बरेच लोक दिवसाच्या सुरुवातीला कॉफी पितात. मात्र, सकाळी ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण आपल्याकडे बरेच लोक फक्त ब्लॅक कॉफी न पिता, त्यामध्ये साखरेचा आणि दुधाचा देखील समावेश करतात. मग काय…अनेकांच्या दिवसाची सुरुवात साखर, मलईदार कॉफीने होते. जे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. जसजसे वजन वाढते तसतसे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी आपण कॉफी घेऊ शकता. मात्र, ती फक्त ब्लॅक कॉफी असावी.
ओट्स नाश्त्यामध्ये घ्या…मात्र, अशाप्रकारे नको…
ओट्समध्ये भरपूर पोषक असतात. आजकाल बरेच लोक नाश्त्यात ओट्स खातात. ओट्स शरीरातील रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील चांगले काम करतात. आजकाल बाजारात भरपूर प्रकारचे ओट्स उपलब्ध आहेत. मात्र, नेहमीच साधे ओट्स खाणे फायदेशीर आहेत. ओट्स तयार करताना शक्यतो फक्त त्यामध्ये भाज्यांचा समावेश करा. त्याव्यतिरिक्त ओट्समध्ये काहीही मिक्स करू नका.
संबंधित बातम्या :
प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’… असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर