मुंबई : ऋतू कोणताही असो शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी पिण्यामुळे तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच, डिहायड्रेशन देखील टाळता. मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात आपण मध मिक्स करून पिला तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (It is beneficial to mix honey in hot water and drink it)
मधयुक्त कोमट पाणी घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पाणी गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि मध घाला. साधारण 20 ते 25 मिनिटे हे उकळूद्या. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो.
नकळतपणे काही चुकीचं खाल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी गरम पाणी पचनतंत्राची मदत करु शकतं. आपण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर आपण दररोज गरम पाण्यात मध मिक्स करून पिला पाहिजे. गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय बळकट होते, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून, ते पाणी प्यायल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते.गरम पाणी लठ्ठ लोकांसाठी एक वरदान आहे.
जर आपल्यालाही लठ्ठपणाची समस्या असेल, तर दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल. दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. धकाधकीच्या जीवनात बरेच लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येसह झगडत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is beneficial to mix honey in hot water and drink it)