मुंबई : आजकाल लोक वजनाच्या बाबतीत खूप सजग झाले आहेत. वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. विशेष करून पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या अत्यंत फायदेशीर आहेत. आपण जर दररोज 20 मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्या तर आपल्या पोटावरची चरबी झटपट कमी होण्यास मदत होते. (Jumping rope is beneficial for reducing belly fat)
दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो.
दोरीवरच्या उड्या ह्या शकतो सकाळच्या वेळीच मारल्या पाहिजे. यामुळे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदा होतो. चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.
सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते. असे केल्याने तुमची मांसाची स्नायू मजबूत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. हा एक कार्डिओ व्यायाम आहे. जो आपण सहजपणे घरी करू शकता. यासाठी, आपण सरळ उभे रहावे आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला स्पर्श केला पाहिजे तर उजवा पाय वरपर्यंत आणला पाहिजे. पुन्हा सुरूवातीच्या स्थितीवर या आणि आता ही प्रक्रिया डावीकडून पुन्हा करा. आपण 30 सेकंदांच्या ब्रेकवर हा व्यायाम दररोज 2 ते 3 सेटमध्ये करू शकता.
संबंधित बातम्या :
Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…
कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Jumping rope is beneficial for reducing belly fat)