हिवाळ्यात ‘या’ बियांच्या सेवनाने आजार होतील दूर, शरीर राहील उबदार

| Updated on: Nov 08, 2024 | 4:33 PM

हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात पौष्टिक तसेच प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेल्या बियांचे सेवन करावे. कारण ते खूप फायदेशीर मानले जाते.

हिवाळ्यात या बियांच्या सेवनाने आजार होतील दूर, शरीर राहील उबदार
Follow us on

थंडीच्या दिवसात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करत असतो. त्यात हिवाळा ऋतूमध्ये आणखी एक फायदेशीर बाब म्हणजे या हंगामात मसालेदार अन्नाचे देखील चांगल्या रितीने पचन होते. आता हिवाळा म्हटंल कि सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्यास सुरुवात होते आणि आपले आरोग्य बिघडण्याची भीती वाटते. तर अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती आणि आपले शरीर उबदार राहण्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात पौष्टिक तसेच प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेल्या बियांचे सेवन करा. कारण या दिवसांमध्ये त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. या बियांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास व शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर तुम्ही या बिया थोड्यावेळ पाण्यात भिजवून त्यानंतर देखील सेवन करू शकता. या बिया तुम्ही थोड्या भाजून खाल्ल्याने अधिक फायदा मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या बियांचा समावेश तुम्ही आहारात करू शकतात.

फ्लॅक्ससीड्स : हिवाळ्यात फ्लॅक्ससीड खाणे खूप फायदेशीर ठरते. कारण यामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात. याच्या सेवनाने तुमच्या शरीरात होणारी जळजळ कमी होते. त्वचेला ओलावा प्रदान करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जातात. हिवाळ्यात तुम्ही याचे नियमित सेवन केल्यास शरीर आतून उबदार राहते. हे फ्लॅक्ससीड्स तुम्ही दही, स्मूदी किंवा ओटमीलमध्ये घालून किंवा पावडर स्वरूपात देखील सेवन करू शकतात.

चिया सीड्स : हिवाळाच्या दिवसात तुमच्या आहारात चिया सीड्सचे समावेश करणे महत्वाचे आहे. कारण या सीड्सच्या सेवनाने आपली हाडे मजबूत करण्यास आणि शरीरात उर्जा वाढविण्यास मदत करतात. या चिया सीड्समध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड, प्रथिने आणि फायबर असतात. या सीड्सचे तुम्ही नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते. चिया सीड्सचे सेवन तुम्ही पाण्यात भिजवून किंवा पुडिंग करून स्मूदीमध्ये मिसळुन खाऊ शकता.

भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांमध्ये फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. या बियांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही या बियांचे सेवन केल्याने शरीरात होणारी जळजळ कमी होऊन शरीर आतून उबदार राहण्यास मदत होते. तुम्ही या भोपळ्याच्या बिया भाजून नाश्त्यामध्ये देखील खाल्ल्या जाऊ शकतात.

सूर्यफूलाच्या बिया : सूर्यफूलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, तांबे, सेलेनियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. या बियाच्या सेवनाने शरीराला ऊर्जा प्रदान करतात.तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, जे हिवाळ्यात आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.