महिलांचा अधिक तर वेळ हा स्वयंपाक घरामध्ये व्यतीत होत असतो. जेवण बनवल्याशिवाय स्वयंपाक घरातील अन्य साफसफाई करण्यासाठी महिलांना (Women) खूप सारा वेळ लागतो. अनेकदा स्वयंपाक (Kitchen) घरातील कामे दिवसभर करून सुद्धा वेळेवर संपत नाही. या सगळ्या समस्यांमुळे अनेकदा महिला चिडचिड करतात. या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो.अनेक महिला स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही आणि कुठेतरी एक चिडचिड पणा येण्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या स्वयंपाक घरातील टिप्स( Kitchen Hacks) सांगणार आहोत ज्यामुळे महिलांच्या कामांमध्ये जास्त वेळ घालवावा लागणार नाही तसेच महिला त्यांचे छंद व आवडणाऱ्या गोष्टी मध्ये सुद्धा वेळ घालवू शकतात चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
अनेकदा आपण कुकर मध्ये वेगळे पदार्थ शिजत असतो,अशावेळी डाळ शिजवल्यानंतर कुकर वरील झाकण जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचे पाणी आजूबाजूला पसरून जाते आणि आपले काम वाढते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये जेव्हा आपण डाळ शिजवायला ठेवू अशावेळी कुकरमध्ये एक छोटीशी स्टीलची वाटी अवश्य ठेवा. यामुळे डाळ बाहेर येणार नाही आणि कुकरच्या शिट्टी द्वारे फक्त वाफच बाहेर निघेल.
जर तुमच्या घरी असलेल्या मिठाच्या डब्यामध्ये पाणी सुटू लागल्यास अशावेळी त्या डब्यामध्ये काही तांदुळाचे दाणे टाका. तांदूळ पदार्थांमधील ओलावा शोषून घेतो असे केल्याने घरातील मीठ पूर्वीसारखे होऊन जाईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या अनेकदा जाणवते.
अनेकदा आपण मिक्सर मध्ये वेगळे पदार्थ वाटत असतो. वाटप केल्यानंतर त्या पदार्थांचा सुगंध व चव मिक्सरच्या भांड्यामध्ये तसाच टिकून राहतो आणि बहुतेक वेळा एका पदार्थाचे सुगंध दुसऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा येऊ लागतो अशा वेळी पदार्थाची चव बिघडून जाते. हा सुगंध दूर करण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वॉशिंग लिक्विड चे काही थेंब टाकायचे आहे आणि थोडेसे पाणी टाकून मिक्सर चालू करायचा आहे. असे केल्याने मिक्सर मधील ब्लेड पूर्णपणे स्वच्छ होतील व कोणत्याही पदार्थाचा सुगंध येणार नाही.
जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर अशा वेळी स्वयंपाक घरामध्ये क्लोथ पिनचा वापर करा. एक कलरफुल दोरा बांधून त्यात क्लॉथ पिन लावा छोटे-छोटे रिमाइंडर तुम्ही त्यामध्ये अडकवू शकतात. या सगळ्या गोष्टी मुळे तुम्हाला आपल्याला नेमकी काय करायचं आहे याबद्दल माहिती मिळू शकेल.
तुमचे नखं लहान असतील आणि लसूण वरील साल जर तुम्हाला काढायची असल्यास तर अशावेळी खूप वेळ लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या काही वेळासाठी गरम पाण्यामध्ये टाका त्यानंतर लसूण च्या साली सहजच निघतील.अशाप्रकारे जर तुम्ही छोट्या छोट्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचा स्वयंपाक घरातील बहुतांश वेळ वाचेल.
Russia Ukraine : रशियाकडून जोरदार हल्ले सुरुच, यूक्रेनमध्ये काय घडतंय? अमेरिकेसह नाटोची भूमिका काय?
नवाब मलिक कुटुंबाची उस्मानाबादेत 150 एकर जमीन! भाजपचा मोठा आरोप, ईडी चौकशीची मागणी