घरच्या घरीच काही मिनिटात बनवा पाहिजे तेवढं तूप, किचनमधील या भांड्याच्या करा वापर; काय आहे नवी पद्धत?

| Updated on: Sep 17, 2023 | 8:00 AM

तूपाची किंमत ऐकून आता नाराज होण्याची आणि दुकानातून माघारी फिरण्याची गरज नाही. आता तुम्हाला हवं तेवढं तूप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यासाठी जास्त मेहनतही लागणार नाही. अवघ्या काही मिनिटात तुम्ही पाहिजे तेवढं तूप काढू शकता. काय आहे ही प्रक्रिया?

घरच्या घरीच काही मिनिटात बनवा पाहिजे तेवढं तूप, किचनमधील या भांड्याच्या करा वापर; काय आहे नवी पद्धत?
Ghee
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : दुकानातून तूप खरेदी करणं अत्यंत महागात पडतं. त्यातही शुद्ध तूप मिळेल की नाही याची काही शाश्वती नसते. त्यामुळे मग गावावरून येणाऱ्या नातेवाईकांना तूप आणायला सांगितलं जातं. तेही वेळेत येतील की नाही याची शाश्वती नसते. अशावेळी तुपाची तातडीची गरज असेल तर अडचण होते. कधी कधी गृहिणी घरातच दूधाच्या मलाईपासून तूप काढतात. एकाच भावात दूध आणि तूप दोन्ही मिळतं. पण वेळेच्या अभावी लोकांना असं करणं शक्य नसतं. कारण घरच्या घरी तूप तयार करण्याची पद्धत अत्यंत किचकट असते. ही वेळ खाऊ प्रक्रिया असते. शिवाय मेहनतही खूप लागते. अशावेळी अवघ्या काही मिनिटात घरच्या घरीच तूप तयार करता आले तर…?

तुम्हालाही घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप काढता येणार आहे. तेही अवघ्या काही मिनिटात. त्यासाठी बाजारात एक नवं भांडं आलं आहे. हे भांडं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची चांगलीच झुंबड उडाली आहे. आता घरच्या घरीच जर तूप काढायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जास्त दिवस स्टोअर केलेली मलाई वापरू नका. कारण त्यातून दुर्गंधी येते. फक्त 7 ते 8 दिवस स्टोअर केलेली मलाई असावी. त्यातून तूप काढावं. तसेच त्यातून दहीही काढू नका.

प्रेशर कुकरमधून तूप काढा

प्रेशर कुकरच्या मदतीने तुम्ही कमी वेळात तूप काढू शकता. त्यासाठी कुकरमध्ये एक वाटी पाणी टाका. त्यात जमा केलेली सर्व मलाई टाका. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवा. एक शिट्टी झाल्यावर कुकर गॅसवरून उतरवा. त्यानंतर कुकरचं झाकण हटवून तूप काढण्यासाठी पुन्हा कुकर गॅसवर ठेवा.

या गोष्टी टाका

जेव्हा तुम्ही कुकरचं झाकण हटवून पुन्हा कुकर गॅसवर ठेवता तेव्हा तूप वेगळं होण्यासाठी कुकरमध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाका. असं केल्याने अत्यंत शुद्ध, स्वच्छ आणि फ्रेश तूप मिळतं. तसेच तूप दीर्घकाळ तसंच राहतं. खराब होत नाही. मग तुम्ही तूप फ्रिजमध्ये ठेवा की बाहेर ठेवा खराब होणार नाही.

असं बनवा देशी तूप

दुकानात जसं मिळतं तसंच दाणेदार तूप तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता. तुम्ही जेव्हा कुकरमध्ये मलाई शिजवता तेव्हा त्यात एक चमचा पाणी टाका. बेकिंग सोडा टाकल्यानंतर काही वेळाने पाणी टाकायचं आहे. जेव्हा मलाईचा रंग तांबूस होईल तेव्हा गॅस बंद करून कुकर उतरवून घ्या. त्यानंतर तूप थंड करून काढून घ्या आणि स्टोअर करून ठेवा.