दुपारच्या जेवणानंतर झोप येते का? यामागची कारणं काय? जाणून घ्या

| Updated on: Nov 09, 2024 | 9:30 AM

दुपारच्या जेवणानंतर झोप, आळस आणि अशक्तपणा जाणवणे सामान्य नाही. या अवस्थेला फूड कोमा (food coma) म्हणून ओळखले जाते. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

दुपारच्या जेवणानंतर झोप येते का? यामागची कारणं काय? जाणून घ्या
दुपारची झोप का येते?
Follow us on

Reasons For Feeling Sleepy : दुपारच्या जेवणानंतर झोप येणे किंवा सुस्ती येणे हे अगदी सहाजिक आहे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आपल्या आजूबाजूचे बरेच लोक जांभई देताना दिसतात. कधीकधी आपल्याला शरीरातून सर्व ऊर्जा निघून गेली आहे आणि झोपेशिवाय पर्याय नाही, असेही वाटते. पण, दुपारच्या जेवणानंतर आपल्याला झोप का येते, हे माहिती असणे देखील गरजेचे आहे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.

दुपारी झोप का येते, याचा तुम्ही विचार केला आहे का? लखनौच्या अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ प्रीती पांडे यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दुपारच्या जेवणानंतर झोप येते का? यामागची कारणं सांगितली.

आहारतज्ज्ञ प्रीती पांडे यांच्या मते, दुपारच्या जेवणानंतर झोप, आळस आणि अशक्तपणा जाणवणे सामान्य नाही. या अवस्थेला फूड कोमा (food coma) म्हणून ओळखले जाते. त्या पुढे म्हणाल्या की, या अवस्थेमागे कोणतेही ठोस कारण नाही आणि लोक बऱ्याचदा जेवणानंतर झोप येणे म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण यामागे काही गंभीर कारणे देखील असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते

दुपारी झोप लागण्याचे कारण काय?

मेंदूतील रक्ताभिसरण कमी होणे: आहारतज्ज्ञांच्या मते दुपारच्या वेळी हलक्या अन्नाचे सेवन करावे. पौष्टिक आहार घेतल्यास पचनासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. अन्न पचविण्यासाठी पचनसंस्थेला अधिक रक्ताची आवश्यकता असते. दुपारच्या जेवणानंतर मेंदूतील रक्ताभिसरण कमी होते. हेच कारण आहे की दुपारच्या जेवणानंतर आपल्याला आळस आणि झोप येते.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते: आहारतज्ज्ञ पुढे म्हणाल्या की, आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. हे आपण वेळोवेळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासारख्या जेवणातून मिळवतो. आपण जे अन्न खातो त्यात असलेले पोषण हे आपल्या शरीराच्या ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत आहे. अन्नाच्या सेवनानंतर लगेचच पचन प्रक्रियेमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय घट होते. यामुळे तंद्री आणि झोप येते.

आळस जाणवू नये म्हणून काय खावे?

तज्ञांच्या मते, जे लोक नाश्ता सोडून थेट दुपारचे जेवण करतात त्यांना ही स्थिती जाणवण्याची शक्यता जास्त असते. चुकलेला नाश्ता भरून काढण्यासाठी अशा लोकांना अनेकदा जड दुपारचे जेवण घेण्याची सवय असते. या सवयीमुळे तंद्री वाढते. ब्रेकफास्टमध्ये संपूर्ण धान्य उत्पादने, ओट्स, ब्राउन ब्रेड, अंडी, ऑमलेट आणि फळे खाणे चांगले आहे जे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करेल. ऊर्जावान आणि हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे. हे आपल्याला अन्न घेतल्यानंतर तुम्हाला आळस येणार नाही.