Health Tips | गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! कमकुवत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती!

| Updated on: Jun 12, 2021 | 3:21 PM

सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबत देखील सोडा पितात. कारण, त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु कदाचित आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे.

Health Tips | गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! कमकुवत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती!
सोडा
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यात, बहुतेक लोक इतर पेयांपेक्षा सोडा पिणे पसंत करतात. सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबत देखील सोडा पितात. कारण, त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु कदाचित आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे. त्यात अनेक प्रकारची रसायने आढळतात, जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात. दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर त्याचा परिणाम हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवर देखील होतो (Know the side effects of soda it is harmful for immune system).

सोडामध्ये मुख्यतः साखर वापरली जाते, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करण्याचे काम करते. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास रोगांशी लढाई करणे अवघड होते, अशा परिस्थितीत संक्रमणाचा धोका वाढतो. सोडा पिण्यामुळे प्रतिकारशक्तीवर कसा परिणाम होतो, हे जाणून घेऊया…

खराब बॅक्टेरिया वाढतात

सोड्याच्या 350 मिलीमध्ये 39 ग्रॅम साखर असते. जास्त प्रमाणात सोड्याचे सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. साखर जीवाणू आणि विषाणू वाढवण्याचे कार्य करते. तसेच, तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत करते.

संसर्गाचा धोका वाढतो

सोडा पिण्यामुळे संसर्गाची जोखीम वाढते, विशेषत: टाईप 2 मधुमेह झालेल्या रुग्णांना लवकर संक्रमण होते. सोड्यामध्ये उपस्थित साखर इम्युनिटी सिस्टमवर परिणाम करते. रोगप्रतिकारक शक्तीमध्ये पांढऱ्या रक्त पेशी असतात, ज्या संक्रमणास विरोध करण्यास मदत करतात. याला ‘किलर रक्तपेशी’ देखील म्हणतात. रोग टाळण्यासाठी टाईप -2 मधुमेहाच्या रुग्णांनी सोडा सेवन करू नये (Know the side effects of soda it is harmful for immune system).

टाईप -2 मधुमेह

दररोज सोडा पिण्यामुळे टाइप -2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. दररोज साखरयुक्त पेय पिण्यामुळे इन्सुलिन वाढते. यामुळे टाईप -2 मधुमेहाचा धोका वाढतो. टाईप -2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी असंतृप्त चरबी आणि सोडा कमी करा.

दाह वाढवते

सोड्यामुळे केवळ शरीरात जळजळ होत नाही, तर रोगप्रतिकारक प्रणालीवरही त्याचा परिणाम होतो. या व्यतिरिक्त जीवघेणा आजार होण्याचा धोका देखील वाढतो. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक दररोज सोडा पीतात त्यांच्या शरीरात यूरिक आम्लाचे प्रमाण जास्त असते, जे शरीराचा दाह वाढवते.

लठ्ठपणा वाढवते

लठ्ठपणामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि दररोज सोडा प्यायल्याने कमी वेळात जास्त चरबी तयार होते. सोडा फक्त कॅलरीज वाढवतो म्हणजे त्यात कोणतेही पौष्टिक घटक नाहीत.

(Know the side effects of soda it is harmful for immune system)

हेही वाचा :

Health | कोरोना कालावधीत लहान मुलांची तब्येत सांभाळाचीय? मग ‘ही’ आसने नक्की ट्राय करा!  

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!