मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी राहण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी हेल्दी आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक मानले जाते, हिरव्या भाज्यांमध्ये (Vegetables) असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरासाठी (Body) फायदेशीर असतात. म्हणून तज्ज्ञ सांगतात की, एका दिवसामध्ये किमान दोन हिरव्या भाज्याचे सेवन करायला हवेच. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर निरोगी राहण्यासाठी आपण दुधी भोपळ्याचे नक्कीच सेवन करायला हवे.
दुधी भोपळ्यामुळे आपले शरीर हे हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, दुधी भोपळ्याची भाजी असो किंवा सूप असो जास्त करून कोणालाही खाण्यासाठी आवडत नाही. मग अशावेळी खास आपण दुधी भोपळ्यापासून चीला तयार करून आहात घेतला पाहिजे. चला जाणून घेऊयात चिल्याची रेसिपी.
किसलेला दुधी भोपळा एक कप, 200 ग्रॅम बेसन, दही, रवा, लाल तिखट, हिरवी मिरची, मीठ, आले, लसूण, हिरवी कोथिंबीर, तेल इत्यादी साहित्य आपल्याला लागेल.
चीला तयार करण्यासाठी एका भांड्यात किसलेला दुधी भोपळ्याचा गर घ्या. आता त्यात बेसन घालून थोडा वेळ ढवळून घ्या. या पिठात सर्व मसाले आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. पिठात आले-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करा. चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर पॅन गरम करून त्यात तेल टाका आणि हे मिश्रण चांगले पसरवा. आता दोन्ही बाजूने चीला बेक करा आणि मस्त गरमा-गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या :
दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!
Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!