मुंबई : बेसनाचा वापर स्वयंपाकघरात अनेक पदार्थ (Food) बनवण्यासाठी केला जातो. बेसनापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. बेसनमध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, फोलेट, थायामिन, जस्त, तांबे असे अनेक पोषक घटक असतात. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवणे किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही बेसनापासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू शकतो. यासोबतच हे पदार्थ वजन कमी (Weight Loss) करण्यासही मदत करतात. ते बनवणे देखील खूप सोपे आहे, बेसनापासून बनवलेल्या पदार्थाचा आहारात (Diet) समावेश केला जाऊ शकतो आणि वजनावर नियंत्रण देखील मिळवले जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात बेसनापासून तयार होणाऱ्या पदार्थांबद्दल सविस्तरपणे.
एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या आणि त्यात पाणी घाला. चांगले फेटून घ्या. मीठ, मिरपूड, लाल मिरची, भाज्या आणि मसाले घाला. 5 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पॅन गरम करा. त्यात थोडं तूप घाला. आता हे मिश्रण तव्यावर ओतावे. आणि चांगले गोलाकारामध्ये पसरून घ्या. त्यानंतर हे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या आणि गरमा गरम सर्व्ह करा, हे खूप चवदार आणि खूप आरोग्यदायी आहे.
बेसनाचा टोस्ट बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एका भांड्यात बेसन, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ आणि तुमच्या आवडीचे मसाले टाका. त्यात पाणी घालून मिक्स करा, आता ब्राउन ब्रेडचे दोन तुकडे करा, पिठात बुडवा, आता ही ब्रेड पॅनमध्ये थोडे लोणी किंवा तूप घालून टोस्ट करा, गरम सर्व्ह करा.
बेसन, मीठ, साखर आणि हळद एका भांड्यात घ्या. त्यात पाणी टाका, नीट मिसळा, वाफवलेल्या पॅनला थोडं तेल लावून ग्रीस करा. एका ग्लासमध्ये बेकिंग पावडर आणि थोडे पाणी एकत्र करा, आता बेसनच्या द्रावणात मिसळा, आता हे द्रावण एका वाफवलेल्या पॅनमध्ये ठेवा, 15 मिनिटे वाफ येऊ द्या, त्यानंतर त्याचे तुकडे करा, आता सर्व्ह करा.